शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
3
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
4
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
5
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
6
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
7
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
8
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
9
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
10
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
11
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
12
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
13
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
14
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
15
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
16
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
17
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
18
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
19
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
20
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी

अंदाजपत्रकाअभावी विहिरींचे काम रखडले

By admin | Published: June 05, 2016 12:03 AM

सतत तीन वर्षांपासून अस्मानी संकटाने हवालदिल झालेल्या नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यावर अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचे सुल्तानी संकट ओढवले आहे.

शेतकरी संकटात : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून क्रूर थट्टानांदगाव खंडेश्वर : सतत तीन वर्षांपासून अस्मानी संकटाने हवालदिल झालेल्या नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यावर अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचे सुल्तानी संकट ओढवले आहे. विहिरीच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्हा परिषदेचा जलसिंचन विभाग, बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप अंदाजपत्रक सादर न केल्याने ८६ विहिरींची कामे रखडली आहेत. ३० जूनपर्यंत ही कामे पूर्णत्वास जाणे अशक्य असल्याने शेतकऱ्यांचे विहिरीचे स्वप्न अधांतरी लटकले आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या ज्या विहिरींची कामे झाली नाही अशा विहिरींचे धडक सिंचन योजनेत वर्गीकरण करण्यात आलेत त्या विहिरींचे अंदाजपत्रक तयार करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद जलसिंचन विभाग, बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पाटबंधारे विभागाकडे देण्यात आली. रोहयोमधून धडक सिंचनमध्ये वर्गीकरण करण्यात आलेल्या १३९ विहिरीपैकी ५३ विहिरींचे अंदाजपत्रक पाटबंधारे विभागाने सादर केले. परंतु उर्वरित ८६ विहिरींचे अंदाजपत्रक जिल्हा परिषद जलसिंचन विभाग, बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाने तहसीलदारांकडे सादर न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीच्या आशा धुसर झाल्या आहेत. एकीकडे पाटबंधारे विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बाबतीत सतर्क असताना दुसरीकडे मात्र जि.प. व सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा चालवल्या जात असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)अधिकारी शेतकऱ्यांशी उद्धट वागतातरखडलेल्या विहिरींबाबत जि. प. जलसिंचन विभागाचे उपअभियंता प्रदीप ढेरे यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता तुमचे काम माझ्याकडे नाही व माझे कुणीच वाकडे करू शकत नाही, अशी उद्धट वागणूक दिल्याचे सिलोडा येथील शेतकरी रवी डांगे व सुधीर सवटे यांनी सांगितले.धडक सिंचनमध्ये ४५ शेतकऱ्यांचा समावेशतालुक्यातील मोरगाव, मलकापूर, राजना, कोहळा जटेश्वर, नांदसावंगी, शिवणी (रसुलापूर), सार्सी, वाढोणा, कोदोरी, बोरगाव, चिखली, फुलआमला, चांदसुरा, अडगाव, सावनेर, जावरा, फुबगाव, वाघोडा, नांदगाव, सालोड, शेलू नटवा, पिंपळगाव, भगुरा, शिलोडा, पापळ, गावनेर, तळेगाव, सातरगाव, शिवरा, टाकळी गिलवा, दाभा, येणस, धानोरा, जळू, लोणी, मोखड, माहुली चोर, वाटपूर, खंडाळा, हरणी, वडूरा, पुसनेर, शहापूर इत्यादी गावातील शेतकऱ्यांचा धडक सिंचनाच्या विहीर योजनेत समावेश असून ४५ गावांतील शेतकऱ्यांना विहिरीचे काम होण्याची आशा लागली आहे. परंतु अधिकाऱ्यांच्या वक्रदृष्टीमुळे शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, ही शंकाच आहे.