उस्मानाबाद : शहरातील एमआयडीसी परिसरातील रहिवासी असलेल्या संजय एकनाथ राठोड याच्याकडून शहर पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्टल जप्त केले आहे. ही कारवाई शहर ठाण्याचे सपोनि आर. ए. बनसोडे यांच्यासह सहकाऱ्यांनी केली. मंगळवारी रात्री शहर पोलिस ठाण्याचे काळजीवाहू प्रभारी सपोनि राजेंद्र बनसोडे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयासमोर नाकाबंदी करीत होते. यावेळी संजय राठोड हा कार (क्र. एमएच २५/ आर ३३३१) मधून तुळजापूरहून उस्मानाबादकडे येत होता. पोलिसांनी त्याच्या गाडीची तपासणी केली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल मिळून आले. पोलिसांनी हे हत्यार जप्त करून राठोड यास अटक केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली व सपोनि राजेंद्र बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि संग्राम जाधव, पोना दीपक नाईकवाडी, महेश घुगे, पोलिस हवालदार शेख पोना शेवाळे, पोलिस शिपाई गुंड यांनी केली. दरम्यान, दोन दिवसांूर्वीच पोलिसांनी उस्मानाबाद शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस जवाहर कॉलनी भागात राहणाऱ्या अजयकुमार कमलाकर अवधूत याच्या घरातून एक जिवंत पिस्टल, स्टिलच्या मॅग्झीनमध्ये सहा काडतुसे, एक फूट तीन इंच लांबीचा चाकू, स्टीलचे पाते असलेला सात इंच लांब व एक इंच रूंदीचा पितळी मूठ असलेला चाकू अशी हत्यारे जप्त केली होती. त्या पाठोपाठ पुन्हा कारवाई केल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
अचलपुरात रोजगाराभिमुख प्रकल्प नसल्याने भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2016 12:30 AM