लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पावसापासून बचाव करण्यासाठी टिप्परखाली लपलेल्या एका इसमाचा चिरडून मृत्यू झाला. ही घटना फे्रजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील नासीरभाई यांच्या खदान परिसरात मंगळवारी सकाळी ८.३० वाजता घडली. देवीदास गंगाराम चैलवार (५०,रा.मासोद) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी फे्रजरपुरा पोलिसांनी टिप्पर चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेतले.मासोदजवळील खदान परिसरात टिप्पर क्रमांक एमएच २७ के-१०४ रस्त्याच्या कडेला उभा होता. दरम्यान पाऊस सुरु असल्याने मजूर देवीदास चैलवार पावसापासून बचावाच्या हेतूने टिप्पर बसला. मात्र, टिप्पर चालक उमेश खंडारे याने टिप्पर मागे घेतल्यामुळे देवीदास चिरडले गेले. माहितीवरून फे्रजरपुऱ्याचे पीएसआय लेवटकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेहास शवविच्छेदनासाठी इर्विनला पाठविले. पोलिसांनी चालकोविरुद्ध भादंविच्या कलम ३०४ अन्वये गुन्हा नोंदविला.दुचाकीवरून पडलेल्या प्रवीणचा उपचारादरम्यान मृत्यूदुचाकीस्वारास लिफ्ट मागणाऱ्यां दुचाकीवरून पडल्याने गंभीर जखमी झाला. हा अपघात विद्यापीठ ते दंत महाविद्यालयादरम्यानच्या मार्गावर मंगळवारी सायंकाळी ४ वाजता घडला. प्रवीण प्रल्हाद खाडे (रा. शिरखेड) हा जखमी झाला. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती अत्यवस्थ असल्याने नागपूरला हलविण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. दूध डेअरीवर काम करणारा लव आप्पा मुंजाळे (रा.रेवसा) याला मद्यधुंद अवस्थेत प्रवीणने लिफ्ट मागितली. मात्र, प्रवीण निवासी मंतीमंद विद्यालयाजवळ दुचाकीवरी कोसळला
पावसामुळे टिप्परखाली बसलेल्या इसमाचा चिरडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 10:35 PM
पावसापासून बचाव करण्यासाठी टिप्परखाली लपलेल्या एका इसमाचा चिरडून मृत्यू झाला. ही घटना फे्रजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील नासीरभाई यांच्या खदान परिसरात मंगळवारी सकाळी ८.३० वाजता घडली. देवीदास गंगाराम चैलवार (५०,रा.मासोद) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी फे्रजरपुरा पोलिसांनी टिप्पर चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेतले.
ठळक मुद्देखदानमधील घटना : चालकाविरुद्ध गुन्हा दाखल