उदासीनता : सवंगणीदरम्यान उडदाला परतीच्या पावसाचा फटकाअचलपूर : तीन-चार वर्षांपासून असलेली सततची नापिकी, शेतमालाचा घसरलेला भाव, मजुरीचे वाढते दर, फवारणीची महागडी औषधे, बियाणे व रासायनिक खते यांसह आदी कारणांमुळे अचलपूर तालुक्यातील शेतकरी डबघाईस आला आहे. मागील आठड्यात परतीचा पाऊस कमी-अधिक प्रमाणात झाल्याने त्याचा फटका सवंगणीला आलेल्या उडीद आणि मुगाच्या पिकाला बसला. नाफेडकडूनही भ्रमनिरास झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतात झालेले उत्पन्न कवडीमोल भावात विकताना डोक्यावरचे कर्ज कसे फेडावे, या विवंचेत शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. मागील काही महिन्यांतील शेती पिकांचे भाव पाहता शेतकऱ्यांच्या हाती येत असणारे आताचे भाव निव्वळ अर्ध्यावर आले आहेत. मागील वर्षी मुगाचे दर ८ ते १० हजार रुपये प्रतिक्विंटल असताना आता तोच मूग ४२०० ते ५२०० वर आला आहे. सोयाबीन, तूर, उडीद या पिकांचीही हीच गत झाल्याने कर्ज कसे फेडावे, ही चिंता त्यांना सतावत आहे. पिकांना हमीभाव देण्याचे शासनाने जाहीर केले असले तरी नाफेडकडून अटी व शर्ती, नियमात गुंतवून अवहेलना करण्याचा प्रयत्न मात्र सुरू झाला आहे. नाफेडचे अधिकारी शेती पिकांना १२ टक्के आर्द्रता आणि स्वच्छ माल, दर्जा या फेऱ्यात अडकवून माल घेण्यास नकार देत पुन्हा पडीक भावात शेतीमाल विकण्यास शेतकऱ्यांना भाग पाडत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तूर, उडीद, मुगाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. परतीच्या पावसाने याला दिलासा मिळाला असला तरी तो नकोसा झाला आहे. सदर पिके धोक्यात आली आहेत. काही भागातील शेतातील सोयाबीनला कोंब फुटले आहेत. यावर्षी सुरुवातीला पावसाने चांगली साथ दिल्याने पिके चांगली होती. त्यामुळे दुष्काळावर मात होईल, असे शेतकऱ्यांना वाटले होते. पण ती आशा फोल ठरली. (शहर प्रतिनिधी)केळीची भाववाढएकीकडे पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले असताना सध्याच्या दराने मागील वर्षीची कसर भरून निघत आहे. यावर्षी आॅगस्ट महिन्यापासून १५ किलोचे भाव ११०० ते १२०० रुपये तर १० किलो १०२५ व नंबर दोनच्या केळीला ६०० रुपये दर मिळत आहे. नवरात्रीत अधिक दरवाढीची चिन्हे आहेत. अचलपूर तालुक्यात जवळपास २० केळी सप्लायर्स असून त्यांच्याकडून तीन हजार टन केळी बाजारपेठेत निर्यात करण्यात येतात.शेतकरी खचलाअस्मानी संकटाने शेतकरी खचला आहे. शासन अजूनही शेतमालाला हमीभाव देण्यास तयार नाही, ही बाब दुर्दैवी आहे, असे मत अचलपूर तालुक्यातील दिनेश बारखडे, अनिल ढेरे (गौरखेडा), मणिराम दहीकर (मल्हारा), संजय अमृतकर (चमक), अनुप चौधरी (एकलासपूर), अविनाश यावले (धोतरखेडा), भिकुलाल उपाध्याय (धामणगाव), अतकरे (वडगाव फत्तेपूर), प्रवीण गाडगे (शिंदी), लोकेश बोबडे (परसापूर), अंबादास कथे (सालेपूर), गुणवंत ठाकरे (हरम), बाळासाहेब गणगणे (अचलपूर) यांनी व्यक्त केले आहे.मागीलवर्षी वादळी पावसाचा फटका केळी पिकाला बसला. यावर्षी केळीचे पीक सुस्थितीत आहे. शेतकरी परिश्रमाने पिकवीत असलेल्या फळ पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने मदत करावी.- श्रीधर क्षीरसागर,प्रगतिशील शेतकरी.रक्ताचा घाम करून शेतकरी दर्जदार फळे पिकवतो. त्याला जर शासनाने अनुदान दिले, तर त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होईल व ग्राहकांनाही होईल.- अतुल लकडे,पुरस्कारप्राप्त युवा शेतकरी
दर घसरल्याने शेतकरी चिंतातूर
By admin | Published: September 28, 2016 12:19 AM