शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

बेसावधपणामुळे रेल्वेने कटून एकाचा मृत्यू, एक गंभीर

By admin | Published: March 03, 2016 12:23 AM

रोजगारासाठी हजारो किलोमिटरचा प्रवास करून शहात आलेले दोन युवक मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास राजापेठ रेल्वे क्रॉसिंगजवळील रेल्वे रुळावर बसले होते.

अमरावती : रोजगारासाठी हजारो किलोमिटरचा प्रवास करून शहात आलेले दोन युवक मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास राजापेठ रेल्वे क्रॉसिंगजवळील रेल्वे रुळावर बसले होते. बेसावधपणामुळे बडनेरा-अमरावती रेल्वे खाली येऊन एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याला दोन्ही पाय गमावावे लागले. मनोज हरिनंदन पांडे (३०) असे मृताचे तर नरसिंग रामधन उरे (२९, दोन्ही राहणार भरतपूर, (जि. सरगुजा, छत्तीसगड) असे गंभीर जखमीचे नाव आहे. जखमीचे दोन्ही पाय रेल्वेने कटले होत. तब्बल पाऊण तास उशिरा मदत मिळाल्याने तो तडफडत राहिला. राजापेठ रेल्वे क्रॉसिंगच्या उड्डाणपूलाचे काम सुरु झाले आहे. यासाठी कंत्रादाराने छत्तीसगड येथील काही मजूर आणले आहेत. मनोज पांडे व नरसिंग उरे हे दोघेही याच कामावर आले होते. मंगळवारी रात्री काम आटोपून मद्यधुंद अवस्थेत रेल्वे रुळावर बसले होते. अचानक बडनेरा-अमरावती रेल्वेने दोघानाही चिरडले. मनोजचा घटनास्थळी मृत्यू झाला तर नरसिंगचे दोन्ही पाय धडावेगळे झाले. अंधारामुळे कोणाचेही या अपघाताकडे लक्ष गेले नाही.जखमीने आरडाओरडा केला असता आसपासच्या नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली. शेवटी पाऊण तासानंतर एका आॅटोरिक्षाद्वारे जखमीला इर्विनमध्ये पाठविण्यात आले.पश्चात राजापेठ पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. जखमीला नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सेवानिवृत्त पीएसआयने नेले नागपूरलारेल्वे रुळावर अत्यवस्थ पडलेल्या नरसिंगला सेवानिवृत्त पीएसआय जामनिक यांनी मदतीचा हात दिला. दोन्ही पाय गमावलेल्या नरसिंगला त्यांनी स्वखर्चाने नागपूरला नेले आहे. तसेच ते स्वत: नरसिंगसोबत रुग्णवाहिकेत गेले. सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने एका परप्रांतिय तरूणाची मदत करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे.