लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : येथील राज्य परिवहन महामंडळाचे बस आगर प्रवाशांच्या जिवावर उठले आहे. येथील भंगार बस गाड्यांमुळे अपघाताची शक्यता असताना, अधिकाऱ्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहेत.परतवाडा आगारातून चांदूर बाजार तालुक्यातील घाटलाडकी येथे दिवसभर फेरी करणारी एमएच ४० - ८६२५ क्रमांकाची बसगाडी पूर्णत: तुटलेल्या अवस्थेत प्रवाशांना घेऊन शुक्रवारी पाठविण्यात आली. अचलपूरशी जुळलेल्या परतवाडा आगारातून मेळघाटच्या धारणी, चिखलदरा, चांदूरबाजार, मोर्शी, वरूड आदी तालुक्यांच्या ग्रामीण भागातही बसफेऱ्या पाठविल्या जातात. तुटलेल्या बसेस पाठवून प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा खटाटोप परतवाडा आगाराने चालविला आहे.भरमसाठ तिकीट आकारून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर एसटी मंडळाने डल्ला मारला आहे. मात्र, मोबदल्यात जुन्या आणि भंगार बसगाड्यांतून प्रवाशांचा प्रवास होत आहे.दररोज तुटलेल्या आणि नादुरुस्त बसगाड्यांचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. शिवशाहीचे स्वप्न दाखविणाऱ्या महामंडळाने ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी व्यवस्थित बसगाड्या पाठवाव्यात, अशी मागणी आहे.
परतवाडा आगारातून धावतात भंगार बसगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 10:37 PM
येथील राज्य परिवहन महामंडळाचे बस आगर प्रवाशांच्या जिवावर उठले आहे. येथील भंगार बस गाड्यांमुळे अपघाताची शक्यता असताना, अधिकाऱ्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहेत.
ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : प्रवाशांचा जीव टांगणीला