इयत्ता तिसरी, चौथीच्या अभ्यासक्रमात बदल : एकाच विषयात चार पुस्तकांचा समावेशगजानन मोहोड - अमरावतीबालकांचा सक्तीचा शिक्षणाचा अधिकार, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार तिसरी व चवथीचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. वेगवेगळ्या विषयांचा समावेश एकाच पुस्तकात करण्यात आल्यामुळे चिमुकल्यांच्या पाठीवरचे ओझेदेखील कमी झाले आहे. या बदललेल्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाचा अनुभव मिळणार आहे. शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण शाळेत करण्यात आले. तसेच बदललेल्या अभ्यासक्रमासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पाठ्यपुस्तकांतील धडे कमी करण्यासाठी यंदा तिसरी व चवथीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. अनेक विषय एकाच पुस्तकात गुंफन करण्यात आली आहे. या विषयांचे धागे एकमेकांशी निगडित आहे. विद्यार्थी जे काही शिकत आहे ते नेमके काय आहे याचे आकलन विद्यार्थ्यांना होणार आहे. एकाच वेळी वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नांकडे पाहण्याची दृष्टी विकसित होऊन सांगा पाहू? करून पहा? जरा डोके चालवा? या शीर्षकाखाली कृतीची जोडही राहणार आहे. त्यामुळे मुलांचे मन अभ्यासात रमायला नक्कीच मदत होईल, असा पाठ्यपुस्तक मंडळाचा हेतू आहे. नवीन पुस्तकांच्या दुनियेत चिमुकले रममान झाले असले तरी हा विषय शिकविण्यासाठी गुरुजींना मात्र पुढील आठवड्यात प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे.घर व परिसरातून अनौपचारिकपणे मुलांची शब्दसंपत्ती विकसित होत असते. इयत्ता चवथीत विद्यार्थ्याला श्रवण, भाषण-संभाषण, वाचन व लेखन ही भाषिक कौशल्ये विकसित करता यावे यासाठी सुलभ व रंजक असे पाठ, कविता आणि पूरक वाचण्यासाठी विविध साहित्य प्रकारांची निवड या अभ्यासक्रमात करण्यात आली आहे. यामध्ये मुलांचे भावविश्व, अनुभव व प्रसंग याचा विचार करण्यात आला आहे. गाभाघटक, मुल्ये व जीवनकौशल्ये याचा अंतर्भाव पाठात राहणार आहे.
दप्तराचे ओझे झाले कमी
By admin | Published: June 29, 2014 11:42 PM