अमरावती/संदीप मानकर
कोरोना काळात अनेक हॉटेल, इतर प्रतिष्ठाने व काही दुग्ध डेअरी बंद असल्याने व खासगी दुग्ध डेअरीत पाहिजे तशी उचल नसल्याने डेअरी व्यावसायिकांनी दूध खरेदीकडे पाठ फिरविली. मात्र, शासकीय दुग्ध विकास यंत्रणेच्या दुग्ध संकलनात प्रतिदिवस तब्बल दोेन हजार लिटर दुधाची आवक वाढल्याची माहिती जिल्हा दुग्ध विकास अधिकारी गिरीश सोनोेने यांनी दिली.
जिल्ह्यात मार्च महिन्यात वीकेंड लॉकडाऊन होते. तसेच आता सुद्धा १५ दिवसांचे लॉकडाऊन सुरू आहे.? त्याचा परिणाम अनेक हॉटेलमध्ये पाहिजे तशी मिठाईची खरेदी होत नसल्याने हॉटेल व्यावसायिकांकडून दुचाकी मागणी घटली आहे.? तसेच दुग्ध डेअरी व्यावसायिक सुद्धा दुग्ध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून दुध खरेदीला पाठ देत आहे.? त्याचा परिणाम तालुका दुग्ध संघ व जिल्हा दुग्ध संघाकडून दुधाचे संकलन होत असून शासकीय दरानुसार दुधाची खरेदी सूरु आहे.? एरवी जानेवारी २०२१ मध्ये २,४८७ लिटरची सरासरी प्रति दिन दुधाची आवक होती. फेब्रुवारी महिन्यात ती २१०० लिटरवर गेली. आता एप्रिल महिन्यात ती आवक चार हजार लिटरवर पोहचली आहे.? ८ तालुका दुग्ध संकलन संघ व २० जिल्हा दुग्ध संकलन संघाकडून सध्या दुधाची खरेदी करण्यात येते. त्यानंतर ते दुध जिल्हा दुग्ध विकास कार्यालयात पाठविण्यात येते. येथे दुधावर प्रक्रिया होऊन पाकीटबंद दूध तयार करून त्याची नेमलेल्या एजन्सीमार्फत विक्री केली जाते. हजार लिटर दूध पावडर निर्मितीकरिता भंडारा जिल्ह्यातील शासकीय दुग्ध उत्पादन संघाकडे पाठविण्यात येत असल्याची माहिती सोनोने यानी दिली.
बॉक्स:
२५ रुपये लिटरने दुधाची खरेदी
३.५ व ८.५ एसएनएफ (सोलिड नॉट फॅट) असलेले गाईच्या दुधाची खरेदी शासकीय दुग्ध संघाकडे २५ रुपये दरानुसार करण्यात येत आहे. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय यंत्रणा त्यांच्या दुधाची पाहिजे तेवढी खरेदी करीत असल्याचे समाधान व्यक्त केले आहे. मात्र, खासगी दुग्ध डेअरी मालकांकडून त्यांना चांगले दर मिळतात मात्र कोरोनाच दुधाचा उठाव नसल्याने पुन्हा शेतकरी शेतकरी दुग्ध संघाकडे वळले आहेत.
कोट
सध्या दुधाची आवक चांगली आहे. कोरोनामुळे दुग्ध डेअरी व हॉटेल चालकांकडून दुधाच्या खरेदीत अनियमीतता होत आहे. मात्र आम्ही शासकीय भावाने शेतकऱ्यांच्या दुधाची खरेदी करीत आहे. दुग्ध संघ त्याचे संकलन करीत आहेत. दुधाची आवक वाढणे ही चांगली गोष्ट आहे.
गिरीष सोनोने
जिल्हा दुग्ध विकास अधिकारी अमरावती