शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

कोरोना काळात रोहयोतून ३६ हजारावर मजुरांच्या हाताला मिळाले काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 4:09 AM

अमरावती; महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात ८४० पैकी ६६१ ग्रामपंचायतीमध्ये २२६८ कामे सुरू आहे. या ...

अमरावती; महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात ८४० पैकी ६६१ ग्रामपंचायतीमध्ये २२६८ कामे सुरू आहे. या कामांवर ३६ हजार ९८३ एवढ्या मजूरांच्या हाताला काम देण्यात आले आहे. त्यांच्या मजुरी दहा रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

काेरोनाच्या संकट काळात सरकारने मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ग्रामीण भागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ३६९८३ मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या काळात मनरेगाअंतर्गत केल्या जाणाऱ्या कामामुळे ग्रामीण भागातील लोकांना मोठा आधार मिळाला आहे. सध्याच्या स्थितीत ग्रामपंचायत क्षेत्रात २२६८ तर यंत्रणाकडे ७८९ कामे सुरू आहेत.या दोन्ही कामांवर ४५९७८ मजूर कामांवर आहेत. जॉब कार्ड असलेल्या व्यक्तीने कामाची मागणी केल्यास प्रशासनाव्दारे मागेल त्याला काम उपलब्ध करून दिली जाते. जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींपैकी ६६१ ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरू आहेत. सुरक्षित अंतराचे पालन करून आणि माॅक्स घालून ही कामे केली जात आहेत. सीसीटी, वनतळे, गाळ काढणे, रस्ते, घरकुल, समतल चर, दगडी बांध, माती बांध, रोपवाटिका व फळबाग लागवड वनीकरणाची कामे करण्यात आल्याने गावालाही फायदा होत आहे. विशेषता अनेक ठिकाणी गाळ काढण्याच्या कामांमुळे पाणीसाठवण क्षमता वाढत आहे.

बॉक्स

दिवसाला २४८ रुपये मजुरी

मजुरांना एका दिवसासाठी २४८ रुपये मजुरी दिली जाते. जिल्ह्यात मस्टर संपल्यानंतर आठ दिवसात मजुरांच्या खात्यात मजुरीची रक्कम थेट जमा करण्यात येते.त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

बॉक्स

तालुका मजूर कामे

अचलपूर ९८२ १३९

अमरावती ७६८ १४०

अंजनगाव ५१६ ११६

भातकुली ८४३ २४०

चांदूर रेल्वे ८३९ १५२

चांदूर बाजार ८५७ ११३

चिखलदरा २१९०९ ३१४

दर्यापूर ९१३ १९८

धामनगाव १५२ ०३३

धारणी ५४६८ २५०

मोशी १५४४ १३३

नांदगाव खं ६८७ १३२

तिवसा ४०२ ९२

वरूड १००३ २१६