लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: तालिबानने अफगाणिस्तानवर केलेल्या चढाईनंतर तेथील नागरिकांना सुरक्षितपणे हलवण्याच्या कारवायांमध्ये अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर येथील एका कन्येने आपले कर्तृत्व व राष्ट्रप्रेम सिद्ध केले असून, तिने १२९ भारतीयांना सुरक्षित मायदेशी परत आणले आहे.दर्यापूरची रहिवासी असलेल्या श्वेता चंद्रकांत शंके ही कन्या २०१७-१८ मध्ये इंडियन एअरलाईन्समध्ये एअरहोस्टेसपदी रुजू झाली होती. अफगाणिस्तानातील भारतीयांना परत आणण्यासाठी गेलेल्या विमानात ती तैनात होती.तिचे वडील सेवानिवृत्त शिक्षक असून, बहीण व भाऊ वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.
अमरावती जिल्ह्यातल्या कन्येची कर्तबगारी; अफगाणिस्तानातून १२९ भारतीयांना सुरक्षितपणे आणले मायदेशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 3:19 PM