अमोल धवसे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेअंतर्गत तालुक्यातील १३ गावे उद्दिष्टाच्या जवळपास पोहोचली आहेत. पाणीदार गावे साकारण्यासाठी येथील हजारो हात राबत आहेत. यापैकी चार गावांमध्ये भारतीय जैन संघटनेतर्फे जे.सी.बी. व पोकलॅन उपलब्ध करून दिले जाणार आहे. यात मोखड, पिंपळगाव बैनाई, धानोरा गुरव, पापळ या गावांचा समावेश आहे.लोकसहभागातून मनसंधारण ते जलसंधारण अशा टप्प्यातून तालुका पाणी टंचाईमुक्त करण्याच्या दृष्टीने आगेकूच सुरू आहे. या स्पर्धेत प्रत्येक गावातील दररोज १०० ते २०० लोक श्रमदान करीत आहेत. पहिल्याच दिवशी तालुक्यात सुमारे १५०० लोकांनी श्रमदान केले असल्याचे पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक रवींंद्र भिस्ते व अतुल पाटील यांनी सांगितले. स्पर्धेत तालुक्यातील इतर गावेही सहभाग नोंदवितील, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.नांदगाव तालुका टंचाईमुक्त करण्यासाठी प्रत्येक गावातील नागरिक, स्वयंसेवी संस्थांनी या कार्यास हातभार लावावा.- मनोज लोणारकर, तहसीलदार, नांदगाव खंडेश्वर.या स्पर्धेला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चार गावात जे.सी.बी. सुविधा उपलब्ध करून कामाला गती देणार आहोत.- राजेन बोरकर, तालुका समन्वयक, भारतीय जैन संघटना
श्रमदानातून साकारणार पाणीदार गावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 1:22 AM
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेअंतर्गत तालुक्यातील १३ गावे उद्दिष्टाच्या जवळपास पोहोचली आहेत. पाणीदार गावे साकारण्यासाठी येथील हजारो हात राबत आहेत. यापैकी चार गावांमध्ये भारतीय जैन संघटनेतर्फे जे.सी.बी. व पोकलॅन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
ठळक मुद्देपाणी फाऊंडेशनच्या कार्यास गती : भारतीय जैन संघटनेचा मदतीचा हात