शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

अमरावतीत लवकरच धावणार ई-बसेस, केंद्र शासनाकडून ५० बस मंजूर

By गणेश वासनिक | Published: November 03, 2023 8:07 PM

पर्यावरण समृद्धीच्या दिशेने एक पाऊल पुढे, सुसज्ज बस डेपो चार्जिंग स्‍टेशनसह हाेणार विकसित

अमरावती : अमरावती महानगरातील रस्त्यांवर येत्या काही महिन्यातच ई बसेस धावणार आहे. केंद्र शासनाच्या राष्‍ट्रीय शहरी व आवासन मंत्रालयाने ५० बस मंजूर केल्या असून, सार्वजनिक वाहतुकीसाठी त्या सज्ज़ असतील. मेट्रोपॉलिटीन शहराच्या धर्तीवर आता अमरावतीत सुद्धा पर्यावरण समृद्धीच्या दिशेने एक पाऊल पुढे वाटचाल सुरू झाल्याचे चित्र आहे.

केंद्र शासनाचे राष्‍ट्रीय शहरी व आवासन मंत्रालयाचे १ सप्टेंबर २०२३ रोजीच्या पत्रान्‍वये देशातील सर्वसामान्‍य नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतुकीकरीता वापरण्‍यात येणाऱ्या बसेसमध्‍ये इलेक्ट्रिक बसेसचा वाटा वाढविण्‍यात आला आहे. याच हेतूने केंद्र शासनाने पीएम ई बस सेवा योजना सुरु केली असून त्‍यामध्‍ये प्रथम टप्‍प्‍यात अमरावती महानगरपालिकेचा समावेश करण्‍यात आला आहे. आयुक्‍त देविदास पवार यांच्‍या अथक पाठपुराव्याने खासदार नवनीत राणा, खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्‍या विशेष प्रयत्‍नाने नागरीकांच्‍या सेवेकरीता ई-बस महानगरपालिकेला प्राप्‍त होणार आहे.बदलत्या काळानुसार सार्वजनिक वाहतूक सुविधांमध्ये बदल होणे अपेक्षित आहे. त्यानुसार केंद्र शासनाकडे ई- बसेसची मागणीकरण्यात आली होती. ती मंजूर झाली असून, लवकरच या अद्यावत ई-बसेस अमरावती शहराच्या रस्त्यावर धावतील. ही नागरिकांसाठी मोठी उपलब्धी ठरणारी आहे.- देविदास पवार, आयुक्त, महानगरपालिका

टॅग्स :Amravatiअमरावती