शहरं
Join us  
Trending Stories
1
कुटुंबातील दोन जणींना लाभ,'लाडकी बहीण'चे निकष बदलले, फडणवीसांनी महिलांना असे आवाहन केले  
2
संभाजी भिडेंचे ते वक्तव्य अन् हिरवाई उद्यान; पुण्यात लागले मस्त आणि त्रस्त ग्रुपचे बॅनर
3
खासदारकीची शपथ घेण्यासाठी तुरुगांतून बाहेर येणार अमृतपाल सिंह, पॅरोल मिळाल्याची माहिती 
4
४ जुलैला मरीन ड्राईव्ह, वानखेडेवर भेटू...; भारताच्या वाटेवर असताना रोहित शर्माची मोठी घोषणा
5
“हे खरे नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा”; पेपरफुटीवरुन देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना आव्हान
6
High Court: 'यांना उपचाराची गरज'; मोदी-शाह यांना बडतर्फ करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर काय म्हणाले न्यायाधीश?
7
नार्वेकरांमुळे काँग्रेसच्या प्रज्ञा सातवांचा पराभव होणार? शिंदे गटाचा मोठा दावा, असे आहे गणित...
8
तारीख ठरली; 5 जुलै रोजी लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
9
PHOTOS : आई, प्रसिद्ध प्रेजेंटेटर अन् सेलिब्रेटी! बुमराहच्या पत्नीने दाखवले 'छोटेसे जीवन'
10
संस्कार आपापले! मोदी आणि राहुल गांधींच्या संसदेतील वर्तनाची तुलना करत भाजपाने लगावला टोला
11
“राज्यातील भ्रष्ट महायुतीला हटवून महाविकास आघाडीचे सरकार आणा”: रमेश चेन्नीथला
12
Jasprit Bumrah wife Sanjana Ganesan: सगळं सुंदर स्वप्नाप्रमाणे सुरु असताना जसप्रीत बुमराहची पत्नी संजनासोबत घडला विचित्र प्रकार
13
काय करायचे ते करा म्हणणाऱ्या अंबादास दानवेंनी दिलगिरीचे पत्र दिले; म्हणाले, सभागृहातही तयारी....
14
“बालबुद्धीच्या नेत्याने PM मोदींना घाम फोडला, भाजपाला बहुमत गमवावे लागले”: संजय राऊत
15
हार्दिक ऑन टॉप! 'चॅम्पियन' पांड्याला ICC ने दिली खुशखबर; वर्ल्ड कपमधील कामगिरीचे बक्षीस
16
Hathras Stampede : योगी आदित्यनाथांनी दिला हाथरस चेंगराचेंगरीचा ग्राउंड रिपोर्ट!
17
हेमंत सोरेन यांना 6 महिन्यांनंतर जामीन; पुन्हा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार...
18
सालाबादप्रमाणे यंदाही वारकऱ्यांना आजपासून टोलमाफ; कसा मिळवणार? कधीपर्यंत...
19
सेन्सेक्स पोहोचला ८० हजारांपार, लार्जकॅप खासगी बँका चमकल्या; टाटा कन्झ्युमर टॉप गेनर, टीसीएस घसरला
20
Mobile Security:'पासवर्ड सेव्ह करण्याची पद्धतच चुकीची आणि मग म्हणता डेटा चोरीला गेला!'-पीटीआय वृत्तसंस्था

चांदूर बाजारात आठ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी रखडली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 1:28 PM

शेतकऱ्यांनो तुम्ही ई-केवायसी केली नसल्याने दुष्काळाचा निधी रखडला : सतत सूचना देऊनही अव्हेर

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : राज्य शासनाने शेतकऱ्यांना दुष्काळ, अतिवृष्टी व अवकाळी पाऊस यांचा निधी वितरित केला. यामध्ये २०२१-२२ व २०२२-२३ तसेच २०२३ खरीप मधील अतिवृष्टीच्या अंशतः मदतीचा समावेश आहे. महसूल प्रशासनाद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन वारंवार सूचना देण्यात आल्या. मात्र, मार्च महिन्यापासून जूनपर्यंत शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी अद्याप केली नाही.

आजच्या घटकेला तालुक्यात ८ हजार ३०० लाभार्थी शेतकऱ्यांची ई- केवायसी प्रलंबित आहे. अनेक शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यात ई- केवायसी न केल्यामुळे मुदत संपल्यानंतर ते व्ही. के. नंबर रद्द झाले. शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने नव्याने निधी मंजूर करून पुन्हा नवीन व्ही. के. नंबर दिले. ई- केवायसीकरिता व्ही. के. नंबर महसूल प्रशासनाने तलाठ्यांद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले. मात्र, चार महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांनी आपली ई- केवायसी केली नाही. तेव्हा शासन आहे द्यायला, पदर नाही घ्यायला, असे म्हणायची वेळ आली आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांच्या पेंडिंग ई केवायसी पूर्ण करून घेण्यासाठी स्थानिक महसूल प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. त्यासाठी तहसीलदार चांदूरबाजार यांनी मंडळ अधिकारी, तलाठी व सेतू केंद्र चालक यांची संयुक्त बैठक घेतली. बैठकीत या सर्वांना आवश्यक त्या सूचना दिल्या. गावात मुनादी देऊन व प्रत्यक्ष लाभार्थी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्याला ई केवायसी करण्यास प्रेरित करावे, तसेच ई केवायसी संबंधात केलेल्या कामाची विशेष दैनंदिन नोंदी ठेवाव्या. या कामात हयगय केल्यास त्यासंबंधीचा लेखी अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल, अशी सक्त ताकीदही या बैठकीत देण्यात आली.

"स्थानिक महसूल प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. लवकरात लवकर पेंडिंग ई- केवायसी करून घेण्याचा स्थानिक महसूल प्रशासनाचा प्रयत्न राहील."- रूणय जक्कुलवार, तहसीलदार, चांदूर बाजार

टॅग्स :farmingशेतीCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAmravatiअमरावती