शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आमदनी अठन्नी, खर्चा रुपया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 11:04 PM

चौदाव्या वित्त आयोगातून महापालिकेला अवघे २४ कोटी रुपये अनुदान प्राप्त होत असताना एकट्या ‘सिंगल कॉन्टॅÑक्ट’वर ३० कोटी रुपये खर्च होणार असल्याने महापालिकेची स्थिती ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ अशी झाली आहे.

ठळक मुद्देसिंगल कॉन्ट्रॅक्टवर ३० कोटींचा खर्च : तोकड्या निधीवर कोटींची उड्डाणे

प्रदीप भाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चौदाव्या वित्त आयोगातून महापालिकेला अवघे २४ कोटी रुपये अनुदान प्राप्त होत असताना एकट्या ‘सिंगल कॉन्टॅÑक्ट’वर ३० कोटी रुपये खर्च होणार असल्याने महापालिकेची स्थिती ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ अशी झाली आहे. पदाधिकाºयांकडून निधी खेचून आणण्याचा दावा केला जात असला तरी पुढील परिस्थितीला आपणच जबाबदार राहू, अशी भीती यंत्रणाप्रमुखांना सतावत आहे. दैनंदिन स्वच्छतेच्या मल्टिनॅशनल कंपनीला वर्षाकाठी ३० कोटी रुपये दिल्यास अन्य आघाड्यांवर निधी कसा उपलब्ध करायचा, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.शहरातील विकासकामांसाठी उपलब्ध निधी दुसरीकडे वळविण्याच्या आरोपात तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार हे चौकशीला सामोरे जात असल्याने कुणीही तशी रिस्क घ्यायला तयार नाही. त्यामुळे सिंगल कॉन्ट्रॅक्ट कोटींची उड्डाणे घेत असताना प्रशासन तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत आहे. तूर्तास दैनंदिन शहर स्वच्छतेवर वर्षाकाठी १५ ते १६ कोटी रुपये खर्च केले जातात. हा खर्च १४ व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या अनुदानातून भागविला जातो. याशिवाय शहरातील कचरा संकलित करून तो सुकळी कंपोस्ट डेपोत डंम्प करण्यासाठी वाहतुकीवर सुमारे सहा कोटी रुपये खर्च केले जातात. उर्वरित निधी स्वच्छतेविषयक अन्य घटकांवर खर्च होतो. प्रत्यक्षात आता एका कंपनी (जी आधीच ठरली आहे) वरच वर्षाकाठी तब्बल ३० कोटी रुपये खर्च होणार आहे. १५ ते १६ कोटींचे कंत्राट ३० कोटींवर गेल्याने विरोधकांनी यात ‘काळे’ झाल्याचा आरोप केला आहे. चौदाव्या वित्त आयोगाच्या २४ कोटी नंतरही सहा कोटी मनपा निधीतून वळवावे लागतील. याशिवाय वाहतूक कंत्राटासाठी ६ कोटींचीही जुळवाजुळव आयुक्तांना करावी लागेल. अर्थात १२ कोटी रुपये अन्य खात्यांतून वळविण्याशिवाय महापालिका यंत्रणेजवळ अन्य पर्याय नाही.१४ व्या वित्त आयोगातून होतात ही कामेदैनंदिन स्वच्छतेची देयके, कचरा वाहतुकीची देयके, घनकचरा प्रकल्पाची कार्यान्वयन, वैयक्तिक स्वच्छतागृहाचे अनुदान, सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छतागृहांची उभारणी, डीपीआरचा खर्च, ग्रीन झोनची निर्मिती, स्वच्छ भारत अभिग्यानातील विविध स्वच्छतारिषयक बाबी, महिलांसाठी अत्याधूनिक स्वच्छतागृहांची निर्मिती ही कामे होते.घनकचरा व्यवस्थापनाचे काय ?१४ व्या केंद्रीय वित्त आयोगातून घनकचरा व्यवस्थापन,संकलन, वाहतुकीचा खर्च करणे अपेक्षित आहे. मागील अनेक वर्षांपासून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प रखडल्याने आणि आता त्या प्रकल्पाची उभारणी न केल्यास महापालिकेवर कारवाईची टांगती तलवार असल्याने हा प्रकल्प प्रशासनासाठी आव्हानात्मक आहे. १४ व्या वित्त आयोगातूनच त्याचा खर्च भागवावा लागेल. संपूर्ण २४ कोटी रुपये सिंगल कॉन्ट्रॅक्टरवर खर्च झाल्यास अन्य खर्चाचे काय, हा खरा प्रश्न आहे.