ठळक मुद्देसूर्याकडे थेट पाहणे टाळावे
आॅनलाईन लोकमतअमरावती : सूर्याभोवती लंब वर्तुळाकार मार्गाने फिरणाऱ्या पृथ्वीचे अंतर सूर्यापासून साधारणपणे १५ कोटी किलोमीटर असते. मात्र, येत्या ४ जानेवारी रोजी पृथ्वी आणि सूर्याचे अंतर १४.७१ कोटी किलोमीटर राहील. सूर्य पृथ्वीच्या जवळ असण्याच्या या खगोलीय घटनेला उपसूर्य असे म्हणतात. हे अंतर जुलै महिन्यातील अपसूर्य या खगोलीय घटनेपेक्षा सुमारे ५० लाख किलोमीटरने कमी असेल.उपसूर्य या घटनेचा जीवसृष्टीवर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, सूर्याकडे थेट पाहणे डोळ्यांकरिता धोक्याचे राहील, अशी माहिती हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी दिली.