पंकज लायदे /धारणी (अमरावती) : मेलघाटातील साद्राबाडी गावात शुक्रवारनंतर पुन्हा मंगळवारी सकाळी ११ वाजता भूकंपाचे जबर धक्के बसणे सुरू झाले असून, प्रशासनाने भूकंपाच्या तिव्रतेची कुठलीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी गाव सोडून जाण्याचे ठरविले आहे, तर काही नागरिक परिसरातील आपल्या नातेवाइकांकडे पोहचले आहे. प्राप्त माहिती नुसार मागील १५ दिवसांपासून साद्राबाडी गावात भूकंपाचे जबर धक्के बसणे सुरू आहे. शुक्रवारला ७ ते ८ जबर धक्के बसल्यानंतर तहसीलदार अभिजित गांजरे यांनीसुद्धा गावात भेट देऊन पाहणी केली असता, त्यांनासुद्धा भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे घरातील भांडी पडल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने भूकंपाच्या तिव्रतेची दखल घेतली नाही. जिल् पथ क गावात पाठविले नाही तर भू मापक यंत्रा बाबत कोनतीच माहिती गावकर्यांना दिली नाही नसल्याने मंगल वारला सकाळी ११ वाजता पुन्हा भूकपाचे जबर झटके बसने सुरु झाले आहे प्रशासन या भुकम्पाचि दखल केव्हा घेणार ?किवा घेणार की नाही? की नागरिकांचा जीव गेल्यावर दखल घेणार असा प्रश्न नागरिका समोर पडल्याने नागरिकांनी गाव सोडून जाण्याची तयारी सध्या दर्शविलेली आहे तर काही नागरिक परिसरातील आपल्या इतर नातेवाइका कड़े पोहोचले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याशी संपर्क केला असता, ते मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फ्रंसिंगमध्ये असल्याचे कळले.
आरोग्य केंद्राबाहेर कारमधूनच रुग्णांची तपासणीसाद्राबाडी गावात भूकंपाचे जबर धक्के सतत बसत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत हालत असल्याने पाहून काही अनुचित प्रकार टाळण्यासाठी डॉक्ट्ररांनी कारमध्ये बसूनच रुग्णांवर उपचार केले.
जिल्ह्यातील दोन्ही भूकंपमापक यंत्र बंदअमरावती जिल्ह्यात केवळ धारणी तालुक्यातील खाºयाटेम्भ्रू येथे अणि मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणालगत भूकम्पमापक यंत्र बसविले असून, ते दोन्ही बंद अवस्थेत असल्याने आजच्या भूकंपाची तीव्रता किती हे समजू शकले नाही.
नागरिकांच्या मनात भूकंपाची धास्ती भरली आहे.मंगळवारी पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. कित्येक दिवसांपासून प्रशासनाला माहिती देत आहे. मात्र, दखल घेत नसल्यामुळे आम्ही गाव सोडून जाण्याच्या तयारीत आहोत.- अनिल पटेल, नागरिक, सादराबाडी