लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : साद्राबाडी व लगतच्या काही गावांमध्ये सौम्य स्वरूपाच्या भूकंपाचे धक्के नागरिक अनुभवत आहेत. हा स्वारोहणाचा प्रकार आहे. यामध्ये काही कालावधीत यामध्ये निश्चित कमी येणार असल्याची माहिती जिआॅलॉजीकल सर्वे आॅफ इंडिया (जीएसआय)च्या सूत्रांनी दिली. देख्खनच्या भूस्तरात असलेल्या गॅपमधून पाणी झिरपल्यानंतर तेथील वायू निघण्याची जी प्रक्रिया होते, त्यामुळे भूगर्भात आवाज व कंपण होत असल्याचे ते म्हणाले.साद्राबाडी व लगतच्या १५ ते २० किमीच्या अंतरात दोन आठवड्यांपासून भूगर्भातून आवाज व कंपणे होत आहेत. याची नोंद १ ते २.५ रिश्टर स्केलपर्यंत झालेली आहेत, या ठिकाणी नेमके काय? यासाठी तेथील शास्त्रीय माहिती जाणून घेतली असता, ‘जीएसआय’च्या वैज्ञानिकांनी याची वस्तुस्थिती स्पष्ट केली. ही स्थानिक हालचाल आहे. याला भूकंपाचे स्वारोहण (अर्थक्वेक स्वार्न) म्हणतात. भूकंपाच्या स्थितीत ३ रिश्टर स्केलनंतरच्या कंपणामध्ये घरातील भांडी पडतात. त्यापेक्षा अधिक कंपणे असल्यास घरांना भेगा पडतात. त्याहीपेक्षा अधिक कंपणे असल्यास रस्त्याला, बिल्डिंगला भेगा पडतात. मात्र, यापैकी कोणताही प्रकार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राज्यातील बऱ्याच ठिकाणी लाव्हापासून तयार झालेली देख्खनची जमीन आहे. थंडावा मिळाल्याने गरम भाग खाली गेला. भूगर्भाच्या खूप खालच्या भागात लाव्हा हा वाहतच आहे. काही ठिकाणी पोकळी तयार होते, याला जिआॅलाजिकल भाषेत (लाव्हा ट्यूब) म्हणतात. हा भाग थंडा झाल्यानंतर पावसाचे पाणी भेगांमधून झिरपते. वास्तविकता पाऊस झाल्यानंतर काही कालावधीनंतर जमीन रिचार्ज होते व खालच्या गॅपमधून जो गॅस येतो, तो बाहेर निघण्यासाठी जागा पाहतो. तो निमुळत्या स्वरूपाच्या भेगांमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो. तो फुग्यातून हवा निघण्याचा प्रकार आहे. या प्रचंड दबावामुळे कंपणे व आवाज होतो. हीच स्थिती स्वारोहणाची असल्याचे ‘जीएसआय’ सूत्रांनी सांगितले.राज्यातील भूगर्भात ५१ प्रकारचे भूस्तरमहाराष्ट्रात ५१ प्रकारचे भूस्तर (फ्लो) आढळूण आले आहेत.यापैकी चुनखडी (लाईमस्टोन) मध्ये अधिक भेगा (ट्रॅप) आहेत. जमिनीची रचना असी आहे की यामध्ये एकावर दुसरे खडक (रॉक्स) तयार होतात. बेसॉल्ट, रेबोर्ड, ब्लुबोेल्ट आदी थर आहेत. हे थर एकावर एक असल्याने दबून जातात. यामध्ये बºयाच ठिकाणी पातळ थर असतो. यात पाणी असते. हे पाणी गॅपमधून झिरपल्याने आतमधील चुनखडीला स्वेलींग येते व खडकांमध्ये भेगा पडतात व यामधून पावसाचे पाणी झिरपल्यामुळे ‘अर्थक्वेक स्वार्न’चा प्रकार होत असल्याचे त्यांनी सांगीतले. साद्राबाडी संदर्भातील अहवाल ‘डीएम’ला सादर केलेला आहे. या ठिकाणी जोवर कंपने आहेत. तोवर टीमचे काही सदस्य ‘सिस्मोग्रॉफ’वर याची नोंद घेतील. व याचा अहवाल सादर केल्या जाणार असल्याचे ‘एनसीएस’ पथकाचे भुवैज्ञानिक मनजीतसींग यांनी सांगीतले.‘एमपी‘मधील पंधारामध्ये हीच स्थितीसाद्राबाडीपासून १५ ते २० किमी अंतरावर असलेल्या पंधारा तहसीलमध्ये हीच स्थिती होती. येथे चार महिन्यांत दीड हजारांवर धक्के नागरिकांनी अनुभवले. आता हा प्रकार निवळला आहे. तेथे १.९ रिश्टरस्केलपर्यंत नोंद झाली होती. ज्या ठिकाणी असे प्रकार होतात त्यापैकी ७० टक्के ठिकाणी ‘अर्थक्वेक स्वार्न’चा प्रकार अनुभवास आल्याचे जीएसआयच्या सूत्रांनी सांगितले.
भूकंपाचे स्वारोहण काही कालावधीत कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 10:11 PM
साद्राबाडी व लगतच्या काही गावांमध्ये सौम्य स्वरूपाच्या भूकंपाचे धक्के नागरिक अनुभवत आहेत. हा स्वारोहणाचा प्रकार आहे. यामध्ये काही कालावधीत यामध्ये निश्चित कमी येणार असल्याची माहिती जिआॅलॉजीकल सर्वे आॅफ इंडिया (जीएसआय)च्या सूत्रांनी दिली.
ठळक मुद्दे‘जीएसआय’ची माहिती : देख्खनच्या भूस्तरात काही ठिकाणी कंपने