अमरावती/संदीप मानकर
शहरातील नागरिक चायनीज पदार्थ आवडीने खातात. मात्र, टेस्टिंग पावडर म्हणून ओळख असलेला अजिनोमोटोचा वापर चायनीज पदार्थात करण्यात येत असल्याने ते आरोग्यासाठी हानिकारक असून, नकळत पोटाचे विकार बळावत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली. चायनीज खाताय, की पोटाच्या आजारांना नियंत्रण देताय, असे म्हणायची वेळ आली आहे.
शहरातील मुख्य चौकात नूडल्स, मंच्युरियन व इतर खाद्यपदार्थ विक्री होते. ५० पासून तर १०० रुपयापर्यंत या पदार्थांची प्रतिप्लेट विक्री केली जाते. अनेक हॉटेलमध्ये भाजीला चव येण्याकरिता नॉनव्हेज पदार्थ, अंडाकरी तसेच इतर भाज्यांमध्येसुद्धा अजिनोमोटोचा वापर सर्रास केला जातो. त्यामुळे नागरिकांना नकळत जेवणातून घातक आजार मोफत मिळत आहेत. पदार्थ चविष्ट होण्याकरिता मिठासारखे दिसणाऱ्या अजिनोमोटोचा टेस्टिंग पावडर म्हणून वापर केला जातो. याचा अतिप्रमाणात सतत सेवन केल्यास आतड्याचे, पोटाचे कर्करोगसुद्धा होण्याची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले.
बॉक्स :
काय आहे अजिनोमोटो?
अजिनोमोटोला मोनोसोडियम ग्लूटामिट (एमएसजी) असे म्हणतात. तज्ज्ञानुसार ग्लूटामिट ॲसिडचे ते सोडियम मीठ आहे. हे नैसर्गिकरीत्या पदार्थ वापरून निर्मित केलेले रासायनिक उत्पादन आहे. याचा वापर पूर्वी इतर देशात व्हायचा. पण आता भारतातसुद्धा चायनीज पदार्थ व इतर पदार्थांमध्येसुद्धा याचा वापर केला जातो.
बॉक्स :
म्हणून चायनीज खाणे टाळा
चायनीज पदार्थ खाण्याची आवड लहान मुलांसह तरुणांना अधिक असते. त्यांच्या पोटात जाणारे चविष्ट चायनीज पदार्थांत अजिनोमोटोचा वापर अतिप्रमाणात झाल्याने तो शरीरासाठी हानिकारक ठरून त्यांना न कळत पोटाचे विकार होतात. तसेच विविध प्रकारचे आतड्याचे आजार होण्याची शक्यता असते. तसेच सतत अजिनोमोटोयुक्त चायनीज पदार्थ खाल्ल्याने कर्करोगसुद्धा होऊ शकतो.
कोट
डॉक्टरांचा कोट आहे...