तासाभरात बदलली ‘आॅर्डर’ : महापालिकेतील प्रकारअमरावती : महापालिकेतील भ्रष्ट साखळीवर ‘ब्रेक’ लावण्यासह विभागात ‘नवे’ मूखंड निर्माण होऊ नये, यासाठी आयुक्तांनी बदलीसत्र हाती घेतले आहे. मात्र, काही बदल्यांमध्ये अर्थकारण आणि राजकीय घुसखोरी होत असल्याने आयुक्तांच्या सकारात्मकतेला गालबोट लावण्याचा प्रयत्न होतो आहे.अवघ्या एक-दोन तासांमध्ये बदली आदेशात सुधारणा होत असल्याने ‘अर्थकारणाच्या शंकेला अधिक बळकटी मिळाली आहे. कुणाची बदली कुठे करायची, त्याऐवजी कुणाची पदस्थापना करायची, हे निश्चित झाल्यानंतरच बदली आदेश ‘फायनल’होतो. त्यावर आयुक्त अंतिम स्वाक्षरी करतात. मात्र, अलीकडे याआठवड्यात झालेल्या बदली आदेशामध्ये वारंवार सुधारणा होत असल्याने प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे. सामान्य प्रशासन विभाग वा आस्थापनेचा प्रमुख पूर्ण विचारांनी बदलीची नावे अंतिम करित नाहीत का किंवा बदली आदेशानंतर प्रशासनावर दबाव आल्याने सुधारित आदेश काढले जातात का, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. एखाद-दुसऱ्या बदलीबाबत प्रशासन चुकू शकते. मात्र, अर्धा डझन बदल्यांबाबत अशी सुधारणा होत असेल तर शंका घेण्यास पुरेसा वाव आहे. २६ एप्रिलला आयुक्तांच्या आदेशाने भांडार अधीक्षक प्रल्हाद चव्हाण यांचेकडील प्रभार संजय गंगात्रे यांच्याकडे देण्यात आला तर प्रल्हाद चव्हाण यांना झोन ५ मध्ये सहायक क्षेत्रिय अधिकारी म्हणून पाठविण्यात आले. याआदेशात रात्रीच्या सुमारास तडकाफडकी बदल करण्यात आली. २७ ला रात्री निघालेल्या आदेशाप्रमाणे चव्हाण यांना अभिलेखागारमध्ये, गंगात्रे यांना झोन ५ मध्ये तर मंगेश जाधव यांचेकडे भांडार अधीक्षकाचा प्रभार सोपविण्यात आला. अवघ्या एक-दोन तासांत प्रभाराच्या आदेशामध्ये बदल का करण्यात आला, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. भांडार अधीक्षकपदासाठी अर्थकारण आणि राजकीय दबावतंत्र झाल्याचा आरोप महापालिका वर्तुळात केला जात आहे. (प्रतिनिधी)गंगात्रेंची ‘आॅर्डर’ बदलली२१ एप्रिलच्या आदेशान्वये संजय गंगात्रे यांना झोन क्र. ५ मध्ये पाठविण्यात आले. लगेच त्यांची बदली भांडारमध्ये करण्यात आली. तासाभरात बदली आदेश नव्याने निघाला व गंगात्रे भांडारऐवजी झोन क्र. ५ मधील क. लिपिक एस.यू.काळे यांची बदली एडीटीपीत करण्यात आली तर २७ एप्रिलच्या आदेशान्वये त्यांना एडीटीपीऐवजी पुन्हा झोन क्र. २ मध्ये परत पाठविण्यात आले.हर्षे जीएडीत परतलेसांख्यिकी विभागातील कनिष्ठ लिपिक ज्योती अनासाने यांची बदली उद्यान विभागात करण्यात आली होती. मात्र, तिसऱ्याच दिवशी त्यांना अन्यत्र पाठविण्यात आले. गजेंद्र हर्षे यांची बदली जीएडीमधून झोन क्र.३ मध्ये करण्यात आली. तथापि तिसऱ्याच दिवशी हर्षे जीएडीत परतले. याशिवाय आकोडेंनीही बदलीमधील सुधारित आदेशाचे एक वर्तुळ पूर्ण केले.दोन महिन्यांत बदल्या९ फेब्रुवारी २०१७ च्या आदेशान्वये आरोग्य विभाग (स्वच्छता) मधील विजय सुंदराणी या लिपिकाची झोन क्र.३ मध्ये तर भूषण राठोड यांची जनसंपर्कमधून झोन क्र.४ मध्ये बदली करण्यात आली. २७ एप्रिलच्या आदेशान्वये सुंदराणी यांना जीएडीत तर राठोड यांना जनसंपर्कमध्ये परत पाठविण्यात आले आहे.
बदलीसत्रात अर्थकारण
By admin | Published: May 01, 2017 12:09 AM