अमरावती/ संदीप मानकर
खाद्यतेलाच्या दरांमध्ये काहीशी घसरण झाली आहे. घाऊक विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वच प्रकारच्या खाद्यतेल १० ते १५ रुपयांनी स्वस्त झाले असून यामुळे महागाईच्या काळात महिलांचे किराणा बजेट काही प्रमाणात आटोक्यात आले असून खाद्यतेल ५ रुपयांनी स्वस्त आता चमचमीत पदार्थ खा मस्त!
शहरातील सकरसात परिसरातील काही ठोक व्यापाऱ्यांकडून तेलाचे भाव घेतले असता सर्व प्रकारच्या तेलात प्रति लिटर मागे १० ते १५ रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. सोयाबीनचे भाव अचानक गडगडले आहे. तसेच शेंगदाणे सुद्धा प्रति किलो दहा रुपयांनी स्वस्त झाले त्यामुळे या काळात तेलाचे भाव कमी झाले असले तरी दसरा दिवाळी या सणाला भाव वाढू शकतात असे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.
तेलाचे दर (प्रति लिटर)
ऑगस्ट सप्टेंबर
सोयाबीन १५० १३७
सूर्यफूल १६२ १४७
करडी १६० १७०
पामतेल १४० १३०
शेंगदाणा १६५ १५२
मोहरी १५५ १६०
तीळ १६० १७०
कोट
म्हणून दर झाले कमी
पूर्वी सोयाबीन प्रति क्विंटल १२००० हजारापर्यंत गेले होते. परंतू आता सोयाबीनचे भाव अचानक पडले असून त्यामुळे सोयाबीन तेलाच्या किमतीत घसरण झाली. तसेच शेंगदाणेसुद्धा प्रति किलो १० रुपयांनी कमी झाले. त्यामुळे सरासरी सर्व प्रकारच्या तेलामध्ये लिटर मागे १० ते १५ रुपयांनी घसरण झाली आहे.
रितेश बनारसे, ठोक तेल तथा किराणा विक्रेता
किराणा खर्चात बचत
सध्या महागाई वाढली आहे. पेट्रोलचे भाव तर गगनाला भिडले आहे. किराणा भाव सुद्धा वाढले आहे. मात्र आता तेलाचे भाव थोडे कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे प्रत्येक घरातील किराणा बजेट थोडे आटोक्यात येण्यास मदत होईल.
पुष्पा मुळे गृहिणी अमरावती
कोट
ऑगस्ट महिन्यात तेलाचे भाव चांगलेच वाढले होते. स्वयंपाकात तेलाचा वापर सर्वाधिक होतो. त्यामुळे साधारणपणे एका कुटुंबाला महिन्याला १० ते १५ लिटर तेल लागते. भाव कमी झाल्याने महिन्याकाठी २०० ते २५० रुपयांची आता बचत होईल.
कारेगावकर गृहिणी अमरावती