शिक्षक आक्रमक : विविध मागण्या अमरावती : शिक्षकांच्या विविध मागण्यासंदर्भात शनिवारी शिक्षण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. या महाआक्रोश मोर्चात पाचही जिल्ह्यातील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते. ३ ते ४ वर्षांपासून शिक्षण विभागामध्ये नवनविन अन्यायकारक शासन निर्णय येत असून यामुळे शाळा व्यवस्थापन कार्य करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण होत आहे. घोषित - अघोषीत शाळांना शाळेच्या वय वर्षानुसार अनुदान देण्यात यावे, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शाळेतील कर्मचाऱ्यांच्या जुनीच पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. या मागण्यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांच्या विरुध्द घोषणाबाजी करत मोर्चा विभागीय कार्यालयावर शनिवारी धडकला. यावेळी संजय खोडके, संगीता शिंदे, विकास दिवे, शरद तिरमारे, ललीत चौधरी, निलय बोंडे, प्रविण गुल्हाणे, संजय बुरघाटे, सागर वाघमारे, नितीन गुडधे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शिक्षण संघर्ष समितीचा मोर्चा
By admin | Published: September 18, 2016 12:16 AM