लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अमरावती येथे विद्यार्थ्या$ंना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने तिवसा येथे युवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने अनोखे आंदोलन केले. शिक्षणमंत्री तावडे यांना ‘बालीश’ संबोधून त्यांना नजीकच्या सुरवाडी येथील प्री-प्रायमरीमध्ये प्रतीकात्मक प्रवेश देण्यात आला.विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षण खात्याची जबाबदारी सांभाळणारे तावडे ‘बालीश’ असल्याने त्यांनी नव्याने नर्सरी (बालवाडी) पासून शिक्षण घ्यावे, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली. तावडे यांचा प्रवेश अर्ज मंगळवारी दुपारी सुरवाडी येथील निर्मल किड्स प्री-प्रायमरीच्या मुख्याध्यापकांना देण्यात आला. त्यानंतर तहसील कार्यालयात मंत्री विनोद तावडे यांच्याविरोधात आक्रमक घोषणाबाजी करण्यात आली. तहसीलदार मिताली सेठी यांना निवेदन देण्यात आले.आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना सरकार मोफत उच्च शिक्षणासाठीची सोय उपलब्ध करून देईल काय, हा प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला ‘तुला झेपत नसेल, तर तू शिकू नको. नोकरी कर’, असे अफलातून उत्तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अमरावतीत एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिले होते. त्याचे चित्रीकरण करणाºया अन्य विद्यार्थ्याला अटक करा, असे आदेश त्यांनी दिले होते. सबब, विद्यार्थिविरोधी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा सर्व स्तरांतून निषेध होत आहे. विद्यार्थ्यांसह अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनोद तावडे यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी राज्यपालांच्या नावे दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष वैभव वानखडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रदीप राऊत, राष्ट्रवादी शहराध्यक्ष भूषण यावले, काँग्रेस शहराध्यक्ष अतुल देशमुख, सागर राऊत, अतुल गवड, प्रवीण केने, संजय चौधरी, दिवाकर भुरभुरे, आनंद शर्मा, पिंटू राऊत, वैभव काकडे, किसन मुंदाने, प्रसाद लाजुरकरसह कार्यकर्ते उपस्थित होते.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा बालवाडीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 10:45 PM
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अमरावती येथे विद्यार्थ्या$ंना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने तिवसा येथे युवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने अनोखे आंदोलन केले. शिक्षणमंत्री तावडे यांना ‘बालीश’ संबोधून त्यांना नजीकच्या सुरवाडी येथील प्री-प्रायमरीमध्ये प्रतीकात्मक प्रवेश देण्यात आला.
ठळक मुद्देतिवस्यात युवक काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन, मुख्याध्यापकांना विनंती करून दिला प्रवेश अर्ज