लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शालेय शिक्षण राज्यमंत्री ना.बच्चू कडू यांच्या सभेत अमरावती विभागातील शिक्षणाधिकारी फेल ठरलेत. मंत्र्यांनी विचारलेली आणि मंत्र्यांना अपेक्षित वस्तुनिष्ठ माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडे नव्हती. काहींनी माहिती देण्याचा प्रयत्न केला खरा; पण ती माहिती बच्चू कडू यांच्या कसोटीवर खरी उतरलीच नाही आणि शिक्षणमंत्र्यांच्या परीक्षेत शिक्षणाधिकारी नापास झालेत.शिक्षणाधिकाऱ्यांकडून मिळालेली माहिती गोलगोल फिरविणारी ठरल्यावरून तयारी करून या, आठ दिवसांनी परत बैठक घेऊ, असे ना. बच्चू कडू यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सुचविले. यामुळे अमरावती विभागातील ते सर्व शिक्षणाधिकारी आठ दिवसांत तयारी करून परत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे पुढे हजर होणार आहेत. मंत्र्यांना अपेक्षित सर्व प्रश्नांची तयारी करून ते परीक्षा देणार आहेत.विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण कसे पोहचविता येईल. शाळा सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर उपाययोजनांसह शिक्षण कसे सुरू करता येईल, यावर नावीन्यपूर्ण संकल्पना सांगा. गोलगोल फिरवणारी माहिती देऊ नका. हो किंवा नाही. हो तर कसे आणि नाही तर का नाही हेही स्पष्ट करा, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या सभेत सचविले. दरम्यान, एका शिक्षणाधिकाऱ्याने गावातील मंदिरातील घंटीचा उपयोग शिक्षण देण्याकरिता करता येईल. घंटी वाजवून पालकांना, विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी सुचित करता येईल, अशी नावीन्यपूर्ण संकल्पना बच्चू कडू यांच्यापुढे ठेवली. मात्र, ही मंदिरातील घंटी बच्चू कडंूना प्रभावित करू शकली नाही.शिक्षण सुरू करण्यासंदर्भात गुरुवारी जिल्हा प्रशिक्षण संस्थेत ना.बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर, जिल्हा व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रवींद्र आंबेकर यांच्यासह पाचही जिल्ह्यांतील शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शिक्षणमंत्र्यांच्या परीक्षेत शिक्षणाधिकारी नापास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 5:00 AM
शिक्षणाधिकाऱ्यांकडून मिळालेली माहिती गोलगोल फिरविणारी ठरल्यावरून तयारी करून या, आठ दिवसांनी परत बैठक घेऊ, असे ना. बच्चू कडू यांनी शिक्षणाधिकाºयांना सुचविले. यामुळे अमरावती विभागातील ते सर्व शिक्षणाधिकारी आठ दिवसांत तयारी करून परत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे पुढे हजर होणार आहेत. मंत्र्यांना अपेक्षित सर्व प्रश्नांची तयारी करून ते परीक्षा देणार आहेत.
ठळक मुद्देमंत्र्यांची बैठक : तयारी करून आठ दिवसांनी परत घेणार परीक्षा