अमरावती : राज्याच्या शिक्षण विभागात 24 वर्षे सेवेचा कालखंड पूर्ण केलेल्या 58 अधिका-यांना उपसंचालक दर्जाच्या वेतनश्रेणीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण आयुक्त कार्यालयाचा याबाबत आदेश प्राप्त झाला असून, अधिका-यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.शासकीय अधिका-यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना शासनाने लागू केली आहे. त्यानुसार शिक्षण आयुक्तालयाच्या अधिनस्थ उपशिक्षणाधिकारी व तत्सम महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब (प्रशासन शाखा) मधील पात्र कर्मचा-यांना सुधारित दुसरा लाभ मंजूर करण्यासाठी शिक्षण आयुक्तालयात ८ जानेवारी रोजी निवड समितीची बैठक पार पडली. यामध्ये या संवर्गामधील १५ हजार ६०० ते ३९ हजार १०० ग्रेड पे ५४०० या वेतनश्रेणीचा लाभ घेतलेल्या राज्यभरातील ५८ अधिका-यांना शासनाने आता १५ हजार ६०० ते ३९ हजार १०० अधिक ग्रेड पे ६ हजार ६०० ही सुधारित वेतनश्रेणी (वरिष्ठ वेतनश्रेणी)(द्वितीय स्तर) मंजूर करून शिक्षण उपसंचालक दर्जाच्या अधिका-यांना असलेल्या वेतनश्रेणीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.या अधिका-यांना मिळाला लाभशिक्षण विभागात राज्यभरात विविध ठिकाणी कार्यरत अधिका-यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामध्ये सेवाकर दुपारे, डी.टी. गोंविद, पी.पी. अभ्यंकर, जे.बी. रणपिसे, एस.बी. हिंगोणेकर, एन.टी. पाटील, ए.जे. सोनवणे, एस.आर. जगदाळे, एन.जे. आत्राम, ए.एस. पेंदोर, के.झेड. शेंडे, पी.आर. यादगिरे, एस.बी. माळी, एस.बी. मेंढे, ए.जी. मगदूम, बी.एन. थोरात, सी.डब्ल्यू. देशमुख, व्ही.के. गोरडे, एन.एम. इस्माईल शेख, एस.जे. कु-हाडे, पी.डब्ल्यू कोल्हे, ए.एस. पोले, आर.डी. तुरणकर, एल.एस. पाच्छापुरे, एन.के. देशमुख, टी.एल. मोळे, एस.बी. पाटील, जी.एम. गणबावले, व्ही.पी. कानवडे, एस.पी. पारधी, एम.के. देशमुख, एस.पी. जयस्वाल, एस.जी. मुनघाटे, एन.टी.पट्टनशेटी, ई.जे. खान, एम.एस. जोशी, ए.डब्ल्यू. राऊत, एस.ई उमाळे, जे.जे. खोत, डी.पी. थोरे, डी.टी. जुन्नकर, ए.डी. गुंजाळ, यू.के. डोंगरे, डी.बी. येरवळेकर, पी.बी. मगर, डब्ल्यू.जी. बोलके, एस.ई. चव्हाण, एन.डी. पारधी, ए.एन. देवकरे, आर.एन. कांबळे, आर.के. गेडाम, सी.आर. राठोड, आर.एन. मेश्राम, आर.पी. म्हसतकर यांचा समावेश आहे.
58 अधिका-यांना शिक्षण उपसंचालक दर्जाची वेतनश्रेणी, शिक्षण आयुक्तांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 6:54 PM