वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आनंद व उत्साहाचे प्रतीक असलेला होळी सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. लहान मंडळी तर आठवड्याभरापासून खरेदी आणि इतर तयारीत व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर वसा संस्थेने सोशल मीडियावर जनजागृतीपर मार्गदर्शन केले आहे. प्राण्यांना रंग लावल्यास शिक्षेची तरतूद असून, हिडीस प्रदर्शन न करता नैसर्गिक रंगांनी रंगपंचमी खेळा, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.समाजात अनेक जण सणाच्या अतिउत्साहात रस्त्यावरील बेवारस श्वान, मांजरी, गाय, बैल, गाढव आणि वन्यजिवामध्ये विशेषत: माकडांना गंमत म्हणून रंग लावतात. या रंगामुळे प्राण्यांना अंधत्व येऊ शकते. त्यांना त्वचेचे दुर्धर आजार होऊ शकतात. त्यामुळे प्राण्यांसोबत होळी न खेळण्याचे आवाहन ठकसेन ऊर्फ तुषार इंगोले व शुभम सांयके यांनी केले आहे.रस्त्यावरील बेवारस प्राण्यांना रंग लावल्यास, त्यांच्या अंगावर होळीतील गरम पाणी टाकल्यास किंवा त्यांना इतर कोणताही त्रास दिल्यास, हा प्रकार प्राणी क्रूरता कायदा १९६० आणि हाच प्रकार वन्यजिवाबाबत झाल्यास वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ सुधारणा कायदा २००२ नुसार शिक्षेस पात्र आहे, अशी माहिती वसाचे अॅनिमल रेस्क्यूअर अभिजित दाणी यांनी दिली.रासायनिक रंगांचे अनेक दुष्परिणामरासायनिक रंगांचे अनेक दुष्परिणाम आहेत. लाल रंगात मर्क्युरी सल्फाइटचा वापर होतो. यामुळे लकवा, मेंदूची वाढ खुंटणे, कर्करोग असे आजार जडतात. काळ्या रंगासाठी लेड आॅक्साइड वापरले जाते. यामुळे त्वचेला खाज, मूत्रपिंडाचे विकार बळावतात. हिरव्या रंगात कॉपर सल्फेट मोठ्या प्रमाणात असते. डोळ्यांची खाज व त्यातून पाणी येण्याचे प्रकार यातून घडतात. निळा रंग पार्शियन ब्लू या रसायनाच्या वापरातून बनविले जाते. त्यामुळे त्वचेचे विकार होतात. चांदी रंग अल्युमिनियम ब्रोमाइडने बनविला जातो. त्वचेचा कर्करोग होण्याची भीती यामुळे असल्याचे संस्थेचे मुकेश वाघमारे यांनी सांगितले.आय क्लीन अमरावतीतर्फे ओम गोसटकरच्या आठवणींना उजाळानैसर्गिक रंग तयार करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा निसर्गप्रेमी ओम गोसटकर याच्या आठवणींना आय क्लीन अमरावतीच्या चमूने उजाळा दिला. रविवारी आय क्लिन अमरावतीच्या चमूने छत्री तलाव बगीचा परिसरात नैसर्गिक रंगाचे स्टॉल लावून ओमच्या स्मृती जागविल्या पर्यावरणाविषयी जनजागृतीत ओमचे मोलाचे सहकार्य अमरावतीकरांना लाभले होते. त्याच्या संपर्कात येणाऱ्या युवांना पर्यावरणाचा ध्यास त्याने लावला होता. आय क्लिन अमरावतीचे शंतनु पाटीलसह अन्य मित्रमंडळींनी त्याच्या आठवणींना उजाळा दिला.थोड्याशा मौजेसाठी रासायनिक रंगाने होळी खेळून आपल्या आरोग्यासोबत खेळ करणे ही योग्य बाब नाही. लहानग्यांना या रासायनिक रंगाबद्दल माहिती नाही. तेव्हा घरातील मोठ्या आणि जबाबदार व्यक्तींनी लहानग्यांना नैसर्गिक रंग खेळायला द्यायला हवे.- रोहित रेवाळकर, निसर्गप्रेमी
प्राण्यांना रंग लावल्यास शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:15 PM
आनंद व उत्साहाचे प्रतीक असलेला होळी सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. लहान मंडळी तर आठवड्याभरापासून खरेदी आणि इतर तयारीत व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर वसा संस्थेने सोशल मीडियावर जनजागृतीपर मार्गदर्शन केले आहे. प्राण्यांना रंग लावल्यास शिक्षेची तरतूद असून, हिडीस प्रदर्शन न करता नैसर्गिक रंगांनी रंगपंचमी खेळा, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.
ठळक मुद्देवसा संस्थतर्फे जनजागृती : नैसर्गिक रंगांनी खेळा रंगपंचमी