शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

परिवहन आयुक्तांचा प्रभाव ओसरला

By admin | Published: April 19, 2015 12:15 AM

राज्याचे परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी आरटीओचा कारभार दलालमुक्त असे बघितलेले स्वप्न केवळ स्वप्नच राहिले असून पुन्हा दलालांची गर्दी वाढली आहे.

आरटीओत दलालांची झुंबड : नागरिकांची लूट करण्याचा मार्ग मोकळाअमरावती : राज्याचे परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी आरटीओचा कारभार दलालमुक्त असे बघितलेले स्वप्न केवळ स्वप्नच राहिले असून पुन्हा दलालांची गर्दी वाढली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाने आरटीओत दलालांना दिलासा मिळाला असला तरी परिवहन आयुक्तांचा प्रभाव ओसरल्याचे वास्तव आहे.परिवहन आयुक्त झगडे यांनी चार महिन्यांपूर्वी आरटीओंचा कारभार दलालमुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अधिकाऱ्यांनी दलालांना पिटाळूनदेखील लावले होते. आटीओंच्या कारभाराचे शुद्धिकरण सुरु केले असता काही परवानाधारक दलालांनी परिवहन आयुक्तांच्या या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने दाखल याचिकेवर निर्णय देताना आरटीओत परवानाधारक असलेले दलाल हे बेरोजगार असून त्यांना रोजगाराचे साधन म्हणून परवाने देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगार हिसकावणे संयुक्तिक नाही, असा निर्णय दिला. या निर्णयाने परवानाधारक दलालांना मोठा दिलासा मिळाला, हे वास्तविक आहे. मात्र येथील प्रोदशिक परिवहन कार्यालयात केवळ तीनच परवानाधारक दलाल असल्याची धक्कादायक माहिती आहे. सुमारे ३५० ते ४०० दलाल येथे आरटीओंशी संबंधित कामे करीत असल्याचे दिसून येते. न्यायालयाने दिलेला निर्णय हा परवानाधारक दलालांसाठी असताना याचा लाभ आता अनधिकृत दलाल मोठ्या प्रमाणात घेत आहेत. परिवहन आयुक्त झगडे यांनी दलालांच्या वाढत्या गुंडगर्दीला लगाम लावण्यासाठी दलालमुक्त आरटीओंचा कारभार करण्याचे ठरविले होते. या निर्णयाला अनेकांनी डोक्यावरदेखील घेतले होते. परंतु परवानाधारक दलालांचा आडोशा घेत उच्च न्यायालयात याचिका सादर करून परिहवन आयुक्तांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न काहींनी केल्याचे दिसून येते. उच्च न्यायालयाने दलालांच्या बाजूने निकाल देताच हल्ली आरटीओत नागरिकांपेक्षा दलालांची संख्या अधिक आहे. कामकाजासाठी कोणी व्यक्ती येथे आले की त्याला प्रवेशद्वारावरच घेरले जातात. वाहन चालविण्याचा परवाना, नूतनीकरण, टॅक्स भरणे, फिटनेस, परमीट अशा विविध नावांची यादी हल्ली दलाल वाचत असल्याने कामानिमित्त आलेली व्यक्ती गोंधळून जाते. न्यायालयाच्या निकालापूर्वी परिवहन प्रादेशिक विभागातील अधिकाऱ्यांचे दलालांवर अंकुश होते. मात्र या निकालानंतर दलाल हे अधिकाऱ्यांवर ‘लय भारी’ झाल्याचे चित्र आहे. केवळ तीनच परवानाधारक दलाल असतील तर ४०० अनधिकृत दलाल कसे काम करतात? हा विषय गंभीर आहे. दर दिवसाला अनधिकृत दलालांची संख्या वाढत असून त्यांच्या शिवाय येथे कोणतीही कामे होत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी आरटीओ हे नागरिकांना लूट करण्याचे कुरण ठरत आहे. अनिधकृत दलाल बिनदिक्कतपणे परिसरात येऊन नागरिकांची लूट करीत आहेत. दलालांना विशेष लोकप्रतिनिधींचे अभय असल्याचेदेखील बोलले जात आहे. (प्रतिनिधी)सीमावर्ती नाक्यांसाठी अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धापरिवहन आयुक्त महेश झगडे यांना उच्च न्यायालयाने लगाम लावताच सीमावर्ती नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहनचालकांची लूट सुरु झाली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवर कोणाचेच अंकुश नसल्याने अधिकारी रात्र, अपरात्री वसुली करीत आहेत. सीमावर्ती नाक्यावर कर्तव्यासाठी वरिष्ठांना मोठी रक्कम देण्याची तयारीसुद्धा अनेक मोटर वाहन निरीक्षकांनी चालविली आहे.सीसीटीव्ही कॅमेरे कुचकामीयेथील प्रादेशिक परिवहन विभागात कामकाजावर लक्ष राहावे, यासाठी प्रमुख जागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने दलालांचा प्रवेश होत असताना ही महत्त्वपूर्ण बाब कॅमेऱ्यात कैद होत नसल्याची माहिती आहे. गर्दीच्या ठिकाणी मुद्दामहून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाहीत. सामान्यांची राजरोसपणे आरटीओत लूट होत असताना याकडे अधिकारी, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.इमारतीच्या मागील बाजूस होतात व्यवहारयेथील आरटीओत समोरील भागात मोठी वर्दळ राहत असल्याने अधिकारी आणि दलालांचे व्यवहार हे मुख्य इमारतीच्या मागील बाजूस होत असल्याचे दिसून येते. मागील बाजूस दलालांचा वावर असल्याने ठरावीक अधिकाऱ्यांच्या दालनात या दलालांना थेट प्रवेश दिला जातो. कामानिमित्त येणाऱ्यांसोबत आता थेट पैशाचा व्यवहार दलाल खुलेआम करीत असताना आरटीओचे अधिकारी मूग गिळून आहेत.