शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
3
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
4
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
5
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
6
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
7
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
8
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
9
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
11
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
12
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
13
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
15
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
16
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
17
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
18
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
19
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
20
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड

मद्यपीचा इर्विन रुग्णालयातच गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Published: February 13, 2017 12:04 AM

मद्यपी रूग्णाने स्वत:चा गळा जिल्हा सामान्य रूग्णालयातच कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

खळबळ : जिल्हा सामान्य रूग्णालयाची सुरक्षा वाऱ्यावरअमरावती : मद्यपी रूग्णाने स्वत:चा गळा जिल्हा सामान्य रूग्णालयातच कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. ही घटना शनिवारी रात्री १०.३० वाजता इर्विनमधील वार्ड क्रमांक ६ मध्ये घडली. भीमराव सोने (४२,रा. चिंचोली गवळी, मोर्शी) असे गंभीर जखमीचे नाव असून त्याला प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथिल रूग्णालयात हलविण्यात आले. भीमराव सोने यांना त्यांच्या पत्नीने मद्यधुंद अवस्थेत ११ फेबु्रवारी रोजी सकाळी १०.३० वाजता इर्विनमधील वार्ड क्रमांक ६ मध्ये दाखल केले. अतिमद्यप्राशनामुळे भीमराव सोनेच्या मानसिक स्थितीवर परिणाम होत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले होते. त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरु केले होते. दरम्यान सायंकाळी भीमराव सोने याने स्वत:चा गळा दुपट्ट्याने आवळून आत्महत्येचे प्रयत्न सुरु केले. ही बाब वार्डातील परिचारिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी भीमराव यांना आवरण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र, भीमराव काहीच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे परिचारिका वॉर्डबॉय किंवा सुरक्षारक्षकांच्या शोधात वार्डाबाहेर गेली. काही वेळातच वार्डबाय व सुरक्षारक्षकांनी वार्डात पोहोचून स्थिती हाताळली. भीमराव शांत झाल्याचे पाहून सर्वजण कामात मग्न झाले. मात्र, रात्री भीमरावने पुन्हा वार्डातील बाथरुममध्ये जाऊन खिडकीच्या काचा फोडल्या आणि त्या काचा गळ्यावर मारून स्वत:ला गंभीर जखमी केले. काचा फुटल्याचा आवाज होताच वार्डातील परिचारिकांनी तत्काळ बाथरुमकडे धाव घेतली असता भीमराव हा रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. त्यामुळे परिचारिकांनी इर्विन चौकीतील पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी वार्डाकडे धाव घेऊन बाथरुमचे दार उघडले असता भीमराव रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला आढळला. पोलिसांनी त्याला तातडीने ओपीडी कक्षात नेले. तेथील डॉक्टरांनी उपचार सुरु केले. भीमरावच्या गळ्यावर खोलवर गंभीर जखमा झाल्याचे आढळताच डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि भीमराव शस्त्रक्रिया विभागात नेले. मात्र, त्यानंतरही भीमरावची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने त्याला नागपूरला हलविण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कक्षसेवक, सुरक्षारक्षक बेपत्ताइर्विन रुग्णालयाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. शनिवारी रुग्णाने गळा आवळून व कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार वार्डात घडला. मात्र, त्यावेळी परिचारिकांच्या मदतीसाठी एकही कक्षसेवक उपस्थित नव्हता. तसेच परिचारिका मदत मागण्यासाठी धाऊन बाहेर गेली. मात्र, सुरक्षारक्षकांना शोधण्यात बराच वेळ गेला. परिचारिकांना वेळेवर कोणाचीही मदत मिळाली नाही. परिणामी असला प्रकार घडला.