आॅनलाईन लोकमतअमरावती : राठीनगर येथील घरफोडीच्या घटनांची शाई वाळते न वाळते तोच बुधवारी शहरातील आठ फ्लॅट फोडण्यात आले. त्यात अर्जुननगर परिसरातील पाच फ्लॅटसह मालू ले-आऊटमधील दोन व अकोली रोडवरील भरतनगर येथील एक फ्लॅट फोडून चोरांनी सुमारे १० लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. घरफोडीच्या या घटना बुधवारी दुपारी १२ ते ३ या कालावधीत उघड झाल्या.गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील अर्जुननगर येथील सुखकर्ता अपार्टमेंटमध्ये असलेले पाच कुलूपबंद फ्लॅट लक्ष्य करण्यात आले.नागरिकांमध्ये भीतीमाजी आमदार संजय बंड यांचे बंधू तथा उपकुलसचिव सुजय बंड यांचा फ्लॅट फोडण्यात आला. बंड दाम्पत्य ड्युटीवर गेले असताना त्यांची मुलेही शाळेत गेली होती. दुपारी २ च्या सुमारास प्राजक्ता बंड या ड्युटीवरून परतल्या असता, त्यांना फ्लॅटच्या दरवाज्याचा कुलूपकोंडा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला. चोरीची कल्पना आल्यानंतर त्यांनी आलमारी पाहिली असता, त्यातील ८० ग्रॅम सोन्याच्या वस्तू आणि २५ हजार रुपये रोख लंपास करण्यात आल्याचे दिसून आले.याच अपार्टमेंटमधील मनोज घाटे यांचा फ्लॅट फोडण्यात आला. एमआर असलेल्या घाटे यांनी दोन लाख रुपयांची रोकड मंगळवारी बँकेतून काढली होती. ती रोकड ते नागपूरला घेऊन गेल्यामुळे चोरट्यांनी त्यांच्या घरातून अल्प रक्कम चोरून नेली. नागपूरहून परतल्यानंतर घाटे यांच्या घरातून नेमकी किती रक्कम वा दागिने लंपास करण्यात आले, हे स्पष्ट होईल. याच भागातील आशिष इखे, देशमुख आणि अभय सरोदे यांचेही फ्लॅट फोडण्यात आले. मात्र, चोरांना त्यांच्या फ्लॅटमधून काहीही मिळाले नाही. दुपारी १२ च्या सुमारास या सर्व घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्र्शींचे म्हणणे आहे. दुपारी १२ ते १ च्या सुमारास पांढºया रंगाचे एक चारचाकी वाहन बंड यांच्या घरासमोर थांबले. त्यातून उतरलेल्या दोन व्यक्तींनी ही चोरी केली असावी, अशी माहिती बंड यांच्या शेजारी दिलेल्या एका महिलेने पोलिसांना दिली आहे.याच कालाधीत अकोली मार्गावर असलेल्या भरतनगर येथील हंसध्वनी अपार्टमेंटच्या तिसºया माळ्यावर राहत असलेल्या हरेकृष्ण जयकृष्ण दिवे यांच्या फ्लॅटला लक्ष्य करण्यात आले. एमआयडीसीमध्ये नोकरीरत असलेले दिवे नातेवाईकाच्या विवाह समारंभातून दुपारी २ च्या सुमारास घरी परतल्यानंतर फ्लॅटचा दरवाजा तुटलेला दिसून आला, तर आलमारीही तुटलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यातील ६.५० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने तथा ४० हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. या घटनेची माहिती बडनेरा पोलिसांना देण्यात आली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. दुपारी १२ ते १.३० च्या सुमारास एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दिवे यांचा फ्लॅट फोडला असावा, अशी माहिती दिवे यांच्या शेजाºयांनी बडनेरा पोलिसांना दिली आहे. दुपारी १२ ते ३ च्या सुमारास घडलेल्या सलग आठ घरफोडीच्या घटनांमध्ये सुमारे १० ते ११ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.मालू ले-आऊटमधील दोन फ्लॅट फोडलेफ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येणाºया मालू ले-आऊटमधील हरिगंगा अपार्टमेंट असलेले दोन फ्लॅट फोडण्यात आले. बुधवारी दुपारी १२ ते ३ च्या सुमारास या घटना उघड झाल्या. स्कूल आॅफ स्कॉलर्सजवळ असलेल्या या अपार्टमेंटमधील प्रमोद तुळशीराम पुनसे यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने १० ग्रॅम सोने लंपास केले, तर सुनील दिवाण नामक इसमाच्या घरातून ५०० रुपये लंपास करण्यात आल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. प्रमोद पुनसे हे चंद्रपूरला, तर त्यांची मुलगी शाळेत गेली असताना अज्ञात चोरांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडले.दिवेंच्या घरातून सात लाखांचा ऐवज लंपासअकोली रोडवरील भरतनगर येथील हंसध्वनी अपार्टमेंटमधील हरेकृष्ण दिवे यांच्या घरातून चोरांनी ६.५० लाख रुपयांचे सोने व ४० हजार रुपये रोकड लंपास केली. दिवे कुटुंबीयांसह एका लग्नाला गेले असताना ही चोरी झाली.