शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
2
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
3
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
4
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
5
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
6
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
7
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
8
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
9
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
10
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
11
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
12
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
13
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
14
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
15
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
16
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
17
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
18
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
19
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
20
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक

कोटक महिंद्रा बँकेत आढळल्या ५०० रुपयांच्या आठ बनावट नोटा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 12:25 PM

गुन्हा दाखल : सराफ्यातील बँकेतही आढळली होती फेक करन्सी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जयस्तंभ चौक स्थित कोटक महिंद्रा बँकेत ५०० रुपयांच्या आठ बनावट नोटा आढळल्या. १४ मे रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास तो प्रकार उघड झाला. याप्रकरणी बँक कर्मचारी श्रीकांत काळे (२१, रा. चांदूर बाजार) यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी १४ मे रोजी रात्री ९ च्या सुमारास अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

१४ मे रोजी एक ग्राहक पाच लाख रुपये घेऊन ती रक्कम डिपॉझिट करण्यासाठी कोटक महिंद्रा बँकेत आले होते. पैकी ८०० नोटा या ५०० रुपयांच्या स्वरूपात होत्या. काळे ती रक्कम मोजत असताना त्यांना त्यातील आठ नोटा बनावट आढळून आल्या. त्यामुळे काळे यांनी त्या नोटांची पुन्हा पडताळणी केली तेव्हा त्या बनावटच असल्याचे शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे काळे यांनी आपल्या वरिष्ठांना त्याबाबत माहिती देऊन सायंकाळी सिटी कोतवाली पोलिस ठाणे गाठले.

२० नोटा बनावटविशेष म्हणजे, बँक ऑफ बडोदाच्या सराफा बाजार शाखेत ५०० रुपयांच्या २० नोटा बनावट असल्याचे आढळून आले होते. १६ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ च्या दरम्यान वेगवेगळ्या तीन खातेदारांनी भरलेल्या रकमेत त्या २० नोटा बनावट आढळल्याची तक्रार खोलापुरी गेट पोलिस ठाण्यात करण्यात आली. शाखा व्यवस्थापक शशिकांत वारके (४४) यांच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी ३ मे रोजी सायंकाळी अज्ञात आरोपीविरुद्ध नकली नोटा चलन म्हणून (कलम ४८९ ब) वापरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Mahindraमहिंद्राAmravatiअमरावतीMONEYपैसा