अमरावती, दि. 4 - नोटबंदीनंतरही लाचखोरीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. आठ महिन्यांत राज्यात एसीबी ट्रॅप, अपसंपदा व अन्य भ्रष्टाचाराची ६१६ प्रकरणे उघडकीस आली आहेत. एसीबीने याकालावधीत टाकलेले ५८४ ट्रॅप यशस्वी झाले आहेत. अपसंपदेची १४ प्रकरणे असून भ्रष्टाचाराची अन्य १८ प्रकरणे आहेत. अशी एकूण ६१६ प्रकरणे लाचलुचपत विभागाने उघडकीस आणली आहेत. यामध्ये शेकडो आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. एसीबीने दिलेल्या आकडेवारीनुसार १ जानेवारी ३१ ऑगस्ट २०१७ पर्यंत पुणे विभागात एसीबीने टाकलेले सर्वाधिक १३३ ट्रॅप यशस्वी झाले आहेत. सर्वात कमी म्हणजे अवघे २४ ट्रॅप मुंबई विभागात टाकण्यात आले आहेत. ठाणे ६५, नाशिक ८३, नागपूर ७१, अमरावती ५४, औरंगाबाद ८५ व नांदेडमध्ये ६९ सापळे टाकण्यात आले होते. लाचखोरीत पहिला क्रमांक महसूल विभागाचा असून १४५ सापळे यशस्वी झाले आहेत. नेहमीप्रमाणे दुसरा क्रमांक पोलीस प्रशासनाचा लागतो. १०७ सापळ्यांमध्ये लाच घेताना पोलीस अडकले आहेत. सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी एक ट्रॅप हा अन्न व प्रशासन विभाग, राज्य परिवहन विभाग, म्हाडामध्ये टाकण्यात आला होता. लाचखोरांवर एसीबीची नजर असल्यामुळे अधिकाºयांनी चांगलाच धसका घेतला आहे. वर्ग १ चे ५४ अधिकारी लाचखोरवर्ग १ चे ५४ अधिकारी एसीबीच्या सापळ्यात अडकले आहेत. वर्ग २ चे ६७ तर वर्ग ३ चे सर्वाधिक ४९२ कर्मचारी आणि वर्ग ४ च्या ३० कर्मचाºयांचा लाचखोरांमध्ये समावेश आहे. यावरून लाचखोरीचे प्रमाण किती झपाट्याने वाढत आहेत, हे दिसून येते.
राज्यात आठ महिन्यांत लाचखोरीची ६१६ प्रकरणे, एसीबीचे ५८४ ट्रॅप यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 5:54 PM