लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : तालुक्यातील सहा हजार शेतकऱ्यांना कर्ज वाटपात आठ राष्ट्रीयकृत बँका नापास ठरल्या. सात बारा दिल्यानंतरही शेत जमिनीचा चतु:सिमा नकाशा बँका मागत आहेत. विविध कागदपत्रांच्या अटी शर्ती शेतकऱ्यांना गारद करणाऱ्या ठरल्या आहेत. उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ३० टक्केच कर्ज वाटप तालुक्यातील बँकांनी केले आहे.धामणगाव तालुक्यात पाच एकराआतील १८ हजार ७४९ तर पाच एकरावरील १० हजार १९६ शेतकरी आहेत. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शेतकऱ्यांना किमान कर्ज वाटप तरी योग्य पद्धतीने होईल अशी आशा होती. मात्र, यंदा राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज देऊ शकल्या नाहीत. शहरातील एसबीआय कृषी विकास शाखेने ५०० सभासदांना ४ कोटी ५० लाख रुपये कर्ज दिले. सेंट्रल बँकेने १५० शेतक ऱ्यांना दीड कोटी तर बँक ऑफ महाराष्ट्रने ३१७ शेतकऱ्यांना ४ कोटी ५० लाख १९ हजारांचे पीककर्ज वितरण केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केवळ २०६ शेतकऱ्यांना ९६ लाख ७४ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.अंजनसिंगी येथील राष्ट्रीयकृत बँकेने मोजक्या शेतकऱ्यांना कर्ज वितरित केले. तळेगाव दशासर येथील एसबीआय व देवगावातील बँक ऑफ महाराष्ट्रने त्वरित कर्ज वाटप करावे म्हणून भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिरपूरकर यांनी गरजू शेतकऱ्यांना घेऊन या बँकेत हजेरी लावली. पहिल्या दिवशी मदत करण्याचे मान्य केले असले तरी वीस दिवसात या भागातील शेतकºयांना एक रुपये पिक कर्ज अद्याप मिळाले नाही. या बँकेत शेतकऱ्यांच्या रांगा कायम आहेत. चिंचोली, मंगरूळ दस्तगीर येथील राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज वाटपात दिरंगाई करीत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. प्रथम अर्धे कागदपत्र लिहून दिले की दुसरे सांगतात. त्यानंतर पंधरा दिवसांनी बँकेत बोलवतात. मातत कर्ज मिळत नाही.
आठ राष्ट्रीयकृत बँका नापास : अटी शर्र्तींनी शेतकरी गारद, ३० टक्केच पीक कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 5:00 AM