शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

जानेवारीपासून सहकारातील ६४८ संस्थांची निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 4:10 AM

गजानन मोहोड अमरावती : कर्जमाफी, कोरोना संसर्ग आदी कारणांमुळे सहकारक्षेत्रात वर्षभर रखडलेल्या ६४८ संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग अखेर कायद्यानेच मोकळा ...

गजानन मोहोड

अमरावती : कर्जमाफी, कोरोना संसर्ग आदी कारणांमुळे सहकारक्षेत्रात वर्षभर रखडलेल्या ६४८ संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग अखेर कायद्यानेच मोकळा झालेला आहे. प्रचलित सहकार कायद्यानुसार आपत्कालीन परिस्थितीत वर्षभरानंतर मुदतवाढ देता येत नसल्याने कायद्यात सुधारणा करावी लागते. तूर्त तशी परिस्थिती नसल्याने निवडणुका घेणे हाच पर्याय शिल्लक आहे. त्यामुळेच जानेवारीपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे.

सहकारी संस्थांचे निवडणूक प्राधिकरणदेखील सकारात्मक असल्याने कुठेही आडकाठी न येता निवडणुकीचा मार्ग सुकर होईल. ‘मिशेन बिगेन अगेन’ अंतर्गत आता सर्वत्र शिथिलता आलेली आहे. त्यामुळेच राज्य निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक कोरोना संसर्गात आवश्यक खबरदारी घेऊन चांगल्या पद्धतीने पार पाडली व आता ग्रामीणचा ७० टक्के भाग व्यापलेल्या ५५३ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रत्येक मतदाराचा थेट संपर्क येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीपेक्षा सहकारातील निवडणुका यापेक्षा अधिक सुटसुटीत आहेत. त्यातही आता कोरोनाचा संसर्गदेखील कमी झालेला असल्याने ३१ डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या ६४८ संस्थांच्या निवडणुकीस सहकार विभागदेखील अनुकूल आहे.

कर्जमाफीच्या प्रक्रियेत सहकार विभागाचे अधिकारी, कर्मचारी व्यस्त असल्याने पहिल्यांदा निवडणूक लांबणीवर पडली, त्यानंतर कोरोना संसर्गामुळे पुन्हा दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत आता ३१ डिसेंबरला संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी परिस्थिती नाही. याशिवाय अलीकडे संसर्गदेखील कमी होऊन जिल्ह्याची घडी पूर्वपदावर येत आहे.

बॉक्स

निवडणुकीस पात्र वर्गवारीनिहाय संस्था

* प्रवर्ग ‘अ’ मध्ये सहकारी सूत गिरणी - २

* प्रवर्ग ‘ब’ नागरी पगारदार संस्था - ७

* याच वर्गवारीत विभागस्तरीय पतसंस्था - ६

* सेवा सोसायटी, आदिवासी सहकारी संस्था - ३८२

* जिल्हा/तालुका खरेदी विक्री संघ - ५

* शासकीय अनुदानप्राप्त औद्योगिक संस्था - ४

* वसूल भागभांडवल १ कोटीवर असणाऱ्या पतसंस्था - २३

* प्रवर्ग ‘क’ नागरी/ कर्मचारी पतसंस्था-११९

* प्राथमिक सहकारी ग्राहक भांडार -२२

* सामुदायिक शेती संस्था- १

* प्रवर्ग ‘क’ मजूर सहकारी संस्था-१२

* औद्योगिक संस्था १२

* सुशिक्षित बेरोजगार संस्था -३७

* पाणी वापर/ उपसा जलसिंचन - ३

* प्रक्रिया संस्था-१०

बॉक्स

नऊ बाजार समित्यांचीही निवडणूक

जिल्ह्यातील १२ पैकी नऊ कृषिउत्पन्न बाजार समित्यांचा कार्यकाळ ऑक्टोबरअखेर संपुष्टात आला आहे. या ठिकाणी विद्यमान संचालक मंडळाला सहा महिन्यांची मुदतवाढ सहकार विभागाने दिली आहे. सद्यस्थितीत कोरोना संसर्ग कमी झाल्याने अमरावती, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, चांदूर बाजार, तिवसा, दर्यापूर अंजनगाव सुर्जी व अचलपूर बाजार समितीतही निवडणूक होण्याची शक्यता आहे.

बॉक्स

या आदेशान्वये होती मुदतवाढ

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम (क) मधील तरतुदीप्रमाणे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत जनहिताच्या दृष्टीने कोणत्याही निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार शासनाला आहे. त्यानुसार १८ मार्च व त्यानंतर १७ जून आदेशाने मुदतवाढ देण्यात आली. याशिवाय तिसऱ्यांदा ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता मुदतवाढ देता येत नसल्याचे सहकार विभागाने सांगितले.

कोट

जिल्ह्यातील ६४८ सहकारी संस्थांची मुदतवाढ ३१ डिसेंबरला संपत आहे. शासनाच्या पुढील आदेशान्वये कार्यवाही करण्यात येईल.

- संदीप जाधव, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)