लिंक उघडेना : जुन्याच अधिकाऱ्यांचे नाव कायम अमरावती : नामांकन प्रक्रियेसोबत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी आॅनलाईन यंत्रणा राबविण्याचा दावा करणाऱ्या राज्याच्या ‘चिफ इलेक्टोरल आॅफिसर’च्या अधिकृत संकेतस्थळाला अपडेशनचे वावडे असल्याची बाब उघड झाली आहे. जिल्हास्तरावर निवडणुकीविषयक कामकाज हाताळणाऱ्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदलीे झाल्यानंतरही त्याच अधिकाऱ्यांची नावे संकेतस्थळावर कायम आहेत.माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात निवडणुकीसंदर्भातील संपुर्ण प्रक्रिया संगणकीकृत करण्यात आली आहे. कॉप,ट्रु व्होटर यासारखी अॅपही राज्य निवडणूक आयोगाने ‘लाँच’ केली असून मतदार जनजागृतीसाठी सोशल मिडिया आणि आॅनलाईन यंत्रणेवर भर देण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अर्थात सीईओंच्या ूीङ्म.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावरील अनेक लिंक एकतर उघडत नाहीत किंवा त्यात सुधारित माहिती उपलब्ध नाही.‘बळकट लोकशाहीसाठी सर्वोच्च सहभाग’अशी टॅगलाईन मिरविणाऱ्या चिफ इलेक्टोरल आॅफिसर’महाराष्ट्र यांच्या या संकेतस्थळावर निवडणूक प्रक्रियेसंदर्भात संपर्क साधण्यासाठी जिल्हानिहाय अधिकाऱ्यांची यादी दिली आहे. यात अमरावती जिल्ह्याच्या नावासमोर कॉन्टॅक्ट पर्सन म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या विशालकुमार मेश्राम यांच्या नावाचा उल्लेख आहे. मात्र मेश्राम यांची निवडणूक उपजिल्हाधिकारी म्हणून सहा आठ महिन्यापूर्वीच नांदगाव खंडेश्वर एसडीओ म्हणून बदली झाली असताना या संकेतस्थळावर त्यांचेच नाव कायम आहे. टोल फ्री बंद ‘चिफ इलेक्टोरल आॅफिसर’च्या अधिकृत संकेतस्थळावर अधिक माहितीसाठी १८००-२२-१९५० हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे.या क्रमांकावर रविवारी संपर्क साधला असता आमचे केंद्र महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारसह प्रत्येक रविवारी बंद असते ,असे सांगण्यात आले. राज्यात तूर्तास महापालिका आणि जिल्हापरिषदांसह पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. निवडणुकीदरम्यान कुणालाही निवडणुकीसंदर्भात माहितीची आवश्यकता भासू शकते, मात्र या टोल फ्री क्रमांकावर रविवार असल्याने केंद्र बंद असल्याचे सांगण्यात येते.
इलेक्शन सीईओंच्या संकेतस्थळाला ‘अपडेशन’चे वावडे
By admin | Published: February 06, 2017 12:05 AM