औपचारिक घोषणा : काँग्रेस, राष्ट्रवादी फ्रंट, भाजपला संधीअमरावती : महापालिका प्रभाग समिती सभापती (मिनी महापौर) पदासाठी सोमवारी घेण्यात आलेली निवडणूक अविरोध झाली. यात झोन क्र. १ मध्ये काँग्रेसच्या लुबना तनवीर मुन्ना नवाब, झोन क्र. २ राष्ट्रवादी फ्रंटचे मिलिंद बांबल, झोन क्र. ३ राष्ट्रवादीे फ्रंटच्या ममता आवारे, झोन क्र. ४ चे भाजपचे चंदुमल बिल्दानी तर झोन क्र. ५ मध्ये काँग्रेसच्या फहेमिदा नसरीन युसूफशाह यांची मिनी महापौर पदासाठी वर्णी लागली.जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या अध्यक्षस्थानी मिनी महापौरपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. झोन क्र. १ ते ५ यानुसार दर अर्ध्यातासाच्या फरकाने ही निवडणूक घेण्यात आली. अर्जाची छाननी त्यानंतर प्रभागातील सदस्यांच्या उपस्थितीत ही निवडणूक घेण्यात आली. मिनी महापौरपदासाठी झोननिहाय एकच अर्ज सादर करण्यात आल्यामुळे जिल्हाधिकारी गित्ते यांनी निवड करण्यात आल्याची औपचारीक घोषणा केली, हे विशेष. प्रभाग क्र. ४ बडनेरा या भागाकरीता मिनी महापौरपदासाठी शिवसेना, भाजपत सुरुवातीला वाद होता. मात्र, शिवसेनेचे विरोधी पक्षनेते प्रवीण हरमकर आणि भाजपचे गटनेते संजय अग्रवाल यांनी सामोपचाराने तोडगा काढून चंदूमल बिल्दानी यांना मिनी महापौरपद देण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस, राष्ट्रवादी फ्रंटमध्ये मिनी महापौरपद वाटपाचे सूत्र यापुर्वीच ठरले होते. त्यानुसार सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसचे पक्षनेता बबलू शेखावत, राष्ट्रवादी फ्रंटचे गटनेता अविनाश मार्डीकर यांच्यात एकमत असल्याचे दिसून आले. निवडणुकीत उपायुक्त विनायक औगड, चंदन पाटील, प्रभारी नगरसचिव नरेंद्र वानखडे, योगेश पीठे, प्रकाश चक्रे, संजय वडूरकर, दुर्गादास मिसाळ, नंदू पवार, भूषण पुसतकर, वैद्य, निलेश बावीस्कर आदींनी कामकाजात सहभाग नोंदविला.राष्ट्रवादीच्या ‘त्या’ सात सदस्यांना भोपळाच!महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटचे २३ सदस्य आहेत. मात्र, या गटातून सात सदस्य वेगळे झाले आहेत. सुनील काळे आणि अविनाश मार्डीकर यांच्यात गटनेतापदासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत वाद पोहचला. १३ विरुद्ध ७ सदस्य असा सदस्यांचा वाद आहे. सर्वोच्च न्यायालयाने अविनाश माडीकर यांना गटनेतापदाचे अधिकार बहाल केल्याने १६ सदस्य गटाचीच चलती आहे. परिणामी सुनील काळे, नंदकिशोर वऱ्हाडे, प्रवीण मेश्राम, जयश्री मोरय्या, सपना ठाकूर, आशा निंदाने, विजय बाभुळकर या राष्ट्रवादी सदस्यांना सत्तेचा वाटा मिळत नसल्याने केवळ भोपळाच नशीबी आहे.हे आहेत नवे मिनी महापौरझोन क्र. १ (रामपुरी कॅम्प)- लुबना तनवीर मुन्ना नवाबझोन क्र. २ (खापर्डे बगीचा)- मिलिंद बांबलझोन क्र. ३ (हमालपुरा)- ममता आवारेझोन क्र. ४ (बडनेरा)- चंदूमल बिल्दानीझोन क्र. ५ (भाजीबाजार)- फहेमिदा नसरीन युसूफशाह
मिनी महापौरपदाची निवडणूक अविरोध
By admin | Published: April 14, 2015 12:31 AM