टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीत ११, १२, १५ व १६ फेब्रुवारी रोजी सरपंच, उपसरपंच पदाकरिता निवडणूक होणार आहे. ११ फेब्रुवारीला १० गावांमध्ये, १२ फेब्रुवारी रोजी १० गावांत, १५ फेब्रुवारी रोजी १० व १६ फेब्रुवारीला सहा ग्रामपंचायतींत निवडणुका होऊ घातल्या आहेत. सरपंच, उपसरपंच पदाकरिता होणाऱ्या या निवडणुकीत अध्यासी अधिकारी म्हणून कारकून, मंडळ अधिकारी, तलाठी यांची निवड केली जाणार आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात या निवडणुका होणार आहेत.
----------------
फोटो पी ०५ तिवसा
शिवसेनेचे तिवसा तहसील कार्यालयावर आंदोलन
तिवसा : पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव कमी करण्यासाठी शिवसेनेने तिवसा तहसील कार्यालयावर धडक दिली. तिवसा तहसीलदार वैभव फरतारे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप गौरखेडे, दत्ता माळादे, प्रकाश पडोळे, किशोर सातपुते, अजय आमले उपस्थित होते.
------------------
दर्यापूर तालुक्यात १७ फेब्रुवारीपर्यंत ठरणार सरपंच
दयार्पूर : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीच्या सरपंच तसेच उपसरपंचपदाच्या निवडणुका ११ ते १७ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहेत. जैनपुर, रामतीर्थ, पनोरा, कळमगव्हाण, भामोद, सामदा, माऊली धांडे, करतखेडा, सासन रामापूर आणि नांदरून येथील ११ फेब्रुवारी, तर लासुर, खल्लार, लोतवाडा, रुस्तमपूर, चंडिकापूर, वढाळगव्हाण, उमरी इतबारपूर, उमरी ममदाबाद, धामोडी आणि शिवर बु., येथील १२ फेब्रुवारी रोजी, तर सांगळुद, सासन बु., येवदा, आमला, शिरजदा, कळाशी, पिंपळोद, थिलोरी, शिंगणवाडी आणि गायवाडी येथील १५ फेब्रुवारी रोजी, नांदेड बु., गौरखेडा, मार्कंडा, टोंगलाबाद, दारापूर, शिंगणापूर, उपराई, बेंबळा बु. बोराळा आणि आराळा १६ फेब्रुवारी आणि नालवाडा, रामगाव, वरुड बु., नरदोडा, कान्होली, वडनेरगंगाई, ईटकी, नाचोना, लेहेगाव आणि अडुळाबाजार येथील सरपंच उपसरपंचपदाची निवडणूक १७ फेब्रुवारी रोजी होईल.
---------