शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आठ नगरपालिकांमध्ये विषय समित्यांची निवडणूक

By admin | Published: January 17, 2015 1:00 AM

धामणगाव नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे चार सभापती अविरोध निवडून आले.

अमरावती : धामणगाव नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे चार सभापती अविरोध निवडून आले. पालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी सभागृहात पार पडलेल्या सभेत पाणीपुरवठा समितीवर दिलीप छांगाणी, आरोग्य समितीवर सूरज परसोने, शिक्षण समिती सभापतीपदी रमेश साहू, महिला व बालकल्याण विकास सभापतीपदावर वर्षा काकडे यांची नियुक्ती करण्यात आली. उपसभापतीपदावर सरिता ठोसर यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी भाजप नेते अरूण अडसड, नगराध्यक्ष अर्चना राऊत, निवडणूक निर्णय अधिकारी संजय गरकल, माजी नगराध्यक्ष रत्नमाला पोळ, भाजपाध्यक्ष प्रशांत बदनोरे, माजी नगराध्यक्ष अरूण तिनखेडे, हरीश आठवले, उपाध्यक्ष हेमकरण कांकरिया आदी उपस्थित होते. दर्यापुरात भाजप, काँग्रेस, नगरसुधार समितीला एक-एक सभापतीपदस्थानिक नगर परिषदेतील चार विषय समित्यांपैकी एक भाजप, एक काँग्रेस, नगर सुधार समितीच्या प्रत्येकी एका उमेदवारांनी बाजी मारली. एक पद रिक्त राहिले. बांधकाम समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे श्रीकांत ऊर्फ पप्पू होले यांची निवड करण्यात आली. या पदासाठी दोन उमेदवारांचे अर्ज आले होते. यामध्ये नगरसुधार समितीचे अनिल बागळे यांना २ मते मिळाली तर काँग्रेसचे श्रीकांत होले यांना ३ मते मिळाली. शिक्षण समितीमध्ये भाजपचे नाना माहुरे अविरोध विजयी झाले. महिला व बालकल्याण समितीमध्ये नगरसुधार समितीच्या अंजली भाऊराव पारडे निवडून आल्या. आरोग्य, स्वच्छता समितीमध्ये मीना प्रांजळे यांचा अर्ज आला होता. परंतु तो अवैध ठरल्याने हे पद रिक्त ठेवण्यात आले. उपसभापतीपदासाठी नामनिर्देशन पत्र प्राप्त न झाल्याने हे पदही रिक्त ठेवण्यात आले. पीठासीन अधिकारी म्हणून राहुल तायडे व सुधाकर पानझाडे यांनी काम पाहिले. मोर्शी पालिकेत काँग्रेसचा वरचष्मास्थानिक नगरपालिकेच्या पाच विषय समित्यांसाठी शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत आरोग्य सभापतीपदी काँग्रेसचे ज्योतिीप्रसाद मालवीय, महिला व बालकल्याण सभापतीपदी काँग्रेसच्या प्रभा फंदे यांची निवड झाली. बांधकाम सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप कुऱ्हाडे, शिक्षण सभापतीपदी विदर्भ जनसंग्रामचे अजय आगरकर आणि पाणीपुरवठा समितीच्या उपाध्यक्षपदी महादेव वाघमारे यांची अविरोध निवड झाली. निवडणुकीचे काम तहसीलदार अनिल भटकर यांनी पाहिले.चांदूरबाजार पालिकेत प्रहारचे वर्चस्वस्थानिक नगरपरिषद विषय समित्यांची निवडणूक अविरोध पार पडली. शिक्षण समिती सभापतीपदी प्रहार युवाशक्ती संघटनेचे गोपाळ पांडुरंग तिरमारे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी प्रहारच्या दुलेखाँ बी शेख नजीर तर बांधकाम समितीच्या सभापतीपदी प्रहारच्या सुनीता विजय गणवीर यांची अविरोध निवड झाली. निवडणुकीचे कामकाज तहसीलदार शरद जावळे यांनी सांभाळले. अचलपुरात सत्ता पक्षाचा वरचष्माअचलपूर नगरपालिका विषय समितीच्या सभापती आणि स्थायी समिती सदस्यांच्या निवडणुकीत सत्तापक्षाने बाजी मारली. सर्व सभापतीपदांवर सत्तापक्षाच्या सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली. शुक्रवारी पालिकेच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. सर्व संमतीने ही निवड करण्यात आली. यात बांधकाम समिती सभापतीपदी ममता उपाध्यक्ष, शिक्षण समिती सभापती शीला महल्ले, स्वच्छता समिती सभापतीपदी राजू लोहिया, नियोजन समितीपदी बाबूलाल पंधरे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी अख्तर बानो आणि उपसभापती पदी नंदा चांदणे यांची निवड करण्यात आली. पालिकेच्या पाणीपुरवठा समितीचे सभापतीपद पालिका उपाध्यक्ष मो. गनी शेख रूस्तम आणि स्थायी समिती सभापतीपद नगराध्यक्ष सांभाळतात.स्थायी समितीमध्ये अविरोध निवडून जाणाऱ्यांमध्ये विषय समित्यांचे सर्व सभापती ममता उपाध्याय, शीला महल्ले (भाजप), राजू लोहिया (काँग्रेस), बाबूलाल पंधरे (राकाँ), अख्तर बानो (अपक्ष), मो. गनी यांच्यासह विलास काशिकर, लक्ष्मी बघेले (प्रहार), नाजिया परवीन (अपक्ष) यांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी श्यामकांत म्हस्के यांनी भूमिका पार पाडली.निवडणूक पार पडल्यानंतर विषय समितींच्या सभापतींची घोषणा झाल्यानंतर विजेत्यांच्या समर्थकांनी आतषबाजी करून जल्लोष केला. वरूडच्या तीन समित्या सेनेकडेस्थानिक २३ सदस्यीय नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादीकडे सार्वजनिक बांधकाम समिती, शिक्षण समिती तर काँग्रेसला महिला व बालकल्याण, शिवसेनेला नियोजन व विकास समिती, पाणी पुरवठा समिती, आरोग्य समिती आणि महिला व बालकल्याण समिती तसेच स्थायी समिती शिवसेनेकडे आणि शिक्षण समिती काँग्रेसकडे आहे.पालिकेतील पक्षीय बलाबल पाहता शिवसेना ७, राष्ट्रवादी ५, काँग्रेस दोन आणि अपक्ष एक तसेच विदर्भ जनसंग्राम ५, वरुड विकास आघाडी ३ असे एकूण २३ सदस्य आहे. नगरपरिषदेवर आमदार अनिल बोंडे गट जनसंग्रामचे नगराध्यक्ष रवींद्र थोरात असून शिवसेना- राष्ट्रवादी कॉग्रेसचे समर्थन आहे. सात विषय समित्यांच्या सभापती सदस्यपदाकरीता करीता सकाळी ११ वाजता नामनिर्देशन करण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादीकडे सार्वजनिक बांधकाम समिती आली असून सभापतीपदी तुषार धूर्वे, शिक्षण विषय समिती सभापती पदी कैैैसर जहॉ अन्सार खॉ, शिवसेनेकडे स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी राजू सुपले, पाणी पुरवठा व जलनि:स्सारण समिती सभापतीपदी मदन झळके, नियोजन व विकास समिती सभापती पदसिध्द न. पा. उपाध्यक्ष लिलाधर बेलसरे , महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सुवर्णा तुमराम तर उपसभापतीपदी पदमा भोसले तर स्थायी समिती मध्ये नगराध्यक्ष रविंद्र थोरात पदसिध्द सभापती आहेत.सदस्यामध्ये उपाध्यक्ष लिलाधर बेलसरे, तुषार धूर्वे, कैैैसर जहॉ अन्सार खा, मदन झळके, राज ूसुपले, सुवर्णा तुमराम , महेंद्र देशमुख, किशोर माहोरे, छाया दुर्गे यांचा समावेश आहे. वरुड नगरपरिषदेच्या विषय समित्यावर सुध्दा शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांना सभापतीपदी संधी मिळाली. विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी पिठासिन अधिकारी उपविभागिय अधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे , सहाय्यक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी विजय लोहकरे, सभा लिपीक धनराज मानकर, मनोहर खासबागे, अरुण शेगेकर यांनी काम पाहिले. चिखलदऱ्यात राष्ट्रवादीचे वर्चस्वचिखलदरा नगर पालीकेच्या विषय समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवले. आरोग्य सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेश्मा परवीन, बांधकाम सभापतीपदी राष्ट्रवादीच्या किरण घोडके, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी राकॉच्या सुनीता लांजेवार, उपसभापतीपदी सविता गावंडे तर शिक्षण सभापतीपदी काँग्रेसच्या निता सोमवंशी यांची निवड करण्यात आली. निवडणुकीचे कामकाज तहसीलदार आर.यू. सुराडकर यांनी पाहिले. (प्रतिनिधी)