अमरावती : राजकारणात महत्त्वपूर्ण क्षेत्र म्हणून ओळखले जाणाऱ्या सहकार क्षेत्रातील विविध सहकारी संस्थांची रणधुमाळी सध्या ग्रामीण भागात जोरकसपणे सुरू आहे. जिल्हाभरातील ७२६ सहकारी संस्थांपैकी आतापर्यंत २२१ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. ५०५ सहकारी संस्थांच्या निवडणुका एप्रिल महिन्यात होणार आहेत. या सर्व निवडणूक सहकार विभागाच्या नवीन धोरणानुसार घेण्यात येत आहे. राज्याच्या सहकार विभागाने संस्था, पतसंस्थेमध्ये होणाऱ्या गैरव्यवहाराला लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिविभाग कायदा १९६० मध्ये काही सुधारणा केल्या आहेत. संस्थाचे पदाधिकारी, संचालक मंडळाच्या कारभारातील हस्तक्षेपामुळे गैरप्रकार वाढले होते. पदावर असताना जनहितापैकी स्वहिताचे काम आणि राजकीय स्वहितासाठी या सहकारी संस्थाचा पुरेपूर फायदा घेण्याचे प्रकार बरचशे प्रकार घडले आहेत. त्यामुळे अशा प्रकाराला कायमस्वरुपी ब्रेक लागावा यासाठी सहकार विभागाने सहकारी कायद्यात बदल केले आहेत. ग्रामीण भागात सहकारी संस्थांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. म्हणून सहकारी संस्थांच्या निवडणुकीत चुरस वाढत असते.राजकारणात सहकाराचे वर्चस्व वेगळे असून या सहकारावर वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी सहकारातील नेतेमंडळी सध्या ग्रामीण भागात लक्ष ठेवून आहेत. सध्या जिल्हाभरात सहकार विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या ब, क, ड, ई या वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सुमारे ७२६ संस्था निवडणुकीस पात्र असून आतापर्यंत २२१ संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ५०५ संस्थांच्या निवडणुका विविध टप्प्यात पूर्ण केली जाणार असल्याचे सहकार विभागाच्या सूत्रांनी सांगितले. या निवडणुकामुळे सहकारातील दिग्गज पुढाऱ्यांनी यावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. यावेळी निवडणुकीचे चित्र वेगळे राहणार आहे
२२१ सहकारी संस्थांच्या निवडणुका आटोपल्या
By admin | Published: March 29, 2015 12:29 AM