शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

जानेवारीपासून सहकारातील ६४८ संस्थांच्या निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 4:08 AM

तिसरी मुदतवाढ ३१ डिसेंबरला संपणार, प्रशासनासमोर पेचप्रसंग गजानन मोहोड अमरावती : कर्जमाफी, कोरोना संसर्ग आदी कारणांमुळे सहकारक्षेत्रात वर्षभर रखडलेल्या ...

तिसरी मुदतवाढ ३१ डिसेंबरला संपणार, प्रशासनासमोर पेचप्रसंग

गजानन मोहोड

अमरावती : कर्जमाफी, कोरोना संसर्ग आदी कारणांमुळे सहकारक्षेत्रात वर्षभर रखडलेल्या ६४८ संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग अखेर कायद्यानेच मोकळा झालेला आहे. प्रचलित सहकार कायद्यानुसार आपत्कालीन परिस्थितीत वर्षभऱ्यानंतर मुदतवाढ देता येत नसल्याने कायद्यात सुधारणा करावी लागते. तूर्तास तशी परिस्थिती नसल्याने निवडणुका घेणे हाच पर्याय शिल्लक आहे. त्यामुळेच जानेवारीपासून निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार आहे.

सहकारी संस्थांचे निवडणूक प्राधिकरणदेखील वर्षभर रखडलेल्या निवडणुका घेण्यासाठी सकारात्मक असल्याने कुठेही आडकाठी न येता निवडणुकांचा मार्ग सुकर होईल. ‘मिशेन बिगेन अगेन’ अंतर्गत आता सर्वत्र शिथिलता आलेली आहे. त्यामुळेच राज्य निवडणूक आयोगाद्वारा विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक कोरोना संसर्गात आवश्यक खबरदारी घेऊन चांगल्या पद्धतीने पार पडली आहे व आता ग्रामीणचा ७० टक्के भाग व्यापलेल्या ५५३ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. या निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराचा थेट संपर्क येतो. सहकारातील निवडणुका यापेक्षा अधिक सुटसुटीत आहेत. त्यातही आता कोरोनाचा संसर्गदेखील कमी झालेला असल्याने ३१ डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या ६४८ संस्थांच्या निवडणुका घेण्यास सहकार विभागदेखील अनुकूल आहे.

कर्जमाफीच्या प्रक्रियेत सहकार विभागाचे अधिकारी, कर्मचारी व्यस्त असल्याने पहिल्यांदा निवडणुक लांबणीवर पडल्या, त्यानंतर कोरोना संसर्गामुळे पुन्हा दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत आता ३१ डिसेंबरला संपुष्टात येत आहे. या पार्श्वभुमीवर कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी परिस्थिती नाही. याशिवाय अलीकडे संसर्गदेखील कमी होऊन जिल्ह्याची घडी पुर्वपदावर येत आहे. त्यामुळे आता सहकारातील निवडणुका घेण्यात येणार आहे.

बॉक्स

निवडणुकीस पात्र वर्गवारीनिहाय संस्था

* प्रवर्ग ‘अ’ मध्ये सहकारी सूत गिरणी -२

* प्रवर्ग ‘ब’ नागरी पगारदार संस्था -७

* याच वर्गवारीत विभागस्तरीय पतसंस्था- ६

* सेवा सोसायटी, आदिवासी सह. संस्था -३८२

* जिल्हा/तालुका खरेदी विक्री संघ- ५

* शासकीय अनुदानप्राप्त औद्योगिक संस्था ४

* वसुल भागभांडवल १ कोटीवर असणाऱ्या पतसंस्था -२३

* प्रवर्ग ‘क’ नागरी/ कर्मचारी पतसंस्था-११९

* प्राथमिक सहकारी ग्राहक भांडार -२२

* सामुदायिक शेती संस्था- १

* प्रवर्ग ‘क’ मजूर सहकारी संस्था-१२

* औद्योगिक संस्था १२

* सुशिक्षित बेरोजगार संस्था -३७

* पाणी वापर/ उपसा जलसिंचन - ३

* प्रक्रिया संस्था-१०

बॉक्स

नऊ बाजार समितींचीही निवडणूक

जिल्ह्यातील १२ पैकी ९ कृषी उत्पन्न बाजार समितींचा कार्यकाळ ऑक्टोबरअखेर संपुष्टात आलेला आहे. या ठिकाणी विद्यमान संचालक मंडळाला सहा महिन्यांची मुदतवाढ सहकार विभागाने दिलेली आहे. सद्यस्थितीत कोरोना संसर्ग कमी झाल्याने अमरावती, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, चांदुरबाजार, तिवसा, दर्यापूर अंजनगाव सुर्जी व अचलपूर बाजार समितीतही निवडणूक होण्याची शक्यता आहे.

बॉक्स

या आदेशान्वये होती मुदतवाढ

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम (क) मधील तरतुदीप्रमाणे कोणत्याही नौसर्गिक आपत्तीत जनहिताच्या दृष्टिने कोणत्याही निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार शासनाला आहे. त्यानुसार १८ मार्च व त्यानंतर १७ जून आदेशाने मुदतवाढ देण्यात आली. याशिवाय तिसऱ्यांदा ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता मुदतवाढ देता येत नसल्याचे सहकार विभागाने सांगितले.