अंजनगाव सुर्जी : स्थानिक बाजार समिती निवडणुकीत सहकार गटाची गेल्या २५ वर्षांची विजयी परंपरा मोडीत काढून परिवर्तन पॅनेलने सोसायटी मतदारसंघात अकरापैकी आठ जागांवर दणदणीत विजय नोंदविला. परिवर्तन गटाचे नंदकिशोर काळे (३३६), अरुण चौखंडे (३३३), सुधीर अढाऊ (३२६), सच्चिदानंद काळमेघ (३२०), अरुण खारोळे (३१७) हे सर्वसाधारण मतदार संघातून व श्यामसुंदर गायगोले (३३४) हे ओबीसी मतदारसंघातून आणि अन्नकलीता काळमेघ (३४४) व संगीता वाघ (३२६) या महिला मतदार संघातून विजयी झाल्यात. सहकार गटाचे तीन विजयी उमेदवारांमध्ये बाळासाहेब पोट े(३३४) व गजानन दुधाट (३३३) हे सर्वसाधारण मतदार संघातून व सुधीर नवले (३३६) हे विमुक्त जाती मतदार संघातून विजयी झाले. पराभूत उमेदवारांंमध्ये सहकार गटाचे बाळासाहेब चऱ्हाटे (३०४), संजय ढोक (३१३), विनोद बेरड (२४१) अविनाश सदार (२८७), गजेंद्र साबळे (२७२) ओमप्रकाश काळमेघ (३०१), सुषमा खारोडे (२८५), वृषाली सावरकर (२७७) यांचा व परिवर्तन गटाच्या राजेश तायडे (२५९), साहेबराव राऊत (२८३) व संतोष मट्टे (३०१) यांचा समावेश आहे. हमाल मापारी मतदार संघातही परिवर्तन गटाचा पाठिंबा असल्याने शे. रहिम शे. रहेमान (१४७) हे मो. शाकीर मो. शरिफ (११८) व सै.नईम सै.नसिर (२३) यांचा पराभव करुन निवडून आले. ग्रामपंचायत मतदार संंघाच्या चारही जागी परिवर्तन गटाचे उमेदवार विजयी होणार असल्याचे भाकीत करण्यात आले आहे. सध्या या मतदार संघाच्या निकालावर नागपूर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सहकार गटाचे नेतृत्व करणारे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनंत साबळे यांच्या एकाधिकाराला या निवडणुकीत जबर हादरा बसला. या विजयी परिवर्तनसाठी आमदार प्रकाश भारसाकळे व आमदार रमेश बुुंदिले यांच्यासह माजी आमदार रावसाहेब हाडोळे, शिवाजी झोंबाडे, जगन हरणे, दिनकर गायगोले, राजाभाऊ कळमकर, सुधाकर काकड, शशिकांत मंगळे, विश्वास मोरे, सुनील झोंबाडे, विजय काळमेघ, उध्दव गीते, नितीन पटेल, सुंदरलाल पटेल, बाबुराव उंबरकर, प्रदीप येवले, राजेंद्र भांबुरकर, भास्कर घोगरे ,रमेश मातकर यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)
अंजनगाव सुर्जी बाजार समिती निवडणुकीत प्रस्थापितांना हादरा
By admin | Published: August 24, 2015 12:35 AM