केतन दीपक ऊर्फ दिलीप काळे (३२, रा. मराठा कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. या घटनेची तक्रार यश शरद मंहत (२३ रा. महंतवाडा मोदी धोतरा, ता. नरखेड, जि. नागपूर) यांनी नोंदविल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, त्यात चोर कैद झाला. त्यामध्ये आरोपी हा एमएच २७ बीएम २९९७ या क्रमांकाच्या दुचाकीने आला आणि त्याने इलेक्ट्रिक बाईक चोरल्याचे पोलिसांना आढळून आले.
----------------------------------------
वाहतुकीस अडथळा केल्याने दोघांवर गुन्हा
अमरावती : रस्त्यावर वाहने उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दोन वाहनचालकांविरुद्ध बडनेरा पोलिसांनी शनिवारी गुन्हा नोंदविला. अवधूत पाडुरंग जांभूळकर (४६, रा. अंजनगावबारी) व योगेश कृष्णराव भुतेश्वर (२४ रा. गोपालनगर) अशी आरोपींची नावे आहेत. ही कारवाई एएसआय गजानन बोरवार यांनी केली.
----------------------------------------
श्रमसाफल्य कॉलनीतून दुचाकी लंपास
अमरावती : गाडगेनगर हद्दीतील श्रमसाफल्य कॉलनीतून एका तरुणाची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना शनिवारी उघडकीस आली. हिरालाल साहेबद्दीन कनोजिया (२७ रा. श्रमसाफल्य कॉलनी) यांनी घराच्या गेटसमोर एमएच २७ एटी ६५१९ या क्रमांकाची दुचाकी उभी केली होती. तेथून ती दुचाकी चोराने लंपास केली. त्यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.