लोकमत न्यूज नेटवर्कपथ्रोट/अचलपूर : महिन्यापासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे व वाढत्या तापमानामुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत. तूर, कपाशी पिके पाण्याअभावी सुकत आहेत. केळी, संत्रा पिकांना भारनियमनाचा जबर फटका बसला असून, संत्रा पिकाला पुरेशी पाण्याची मात्रा मिळत नसल्याने ती गळून खाली पडत आहेत. यामुळे संत्राफळांचा सडा पाहून व्यापारी वर्ग बाग खरेदी करण्यास तयार नाहीत.शासनाने शेतकºयांच्या शेतीला आठ तास वीज देऊन पाणी पुरविण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र. लपंडावामुळे शेतकºयांना केवळ चारच तास पाणी मिळत असून ते पिकांना पुरेसे नसल्याने पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. गतवषीर्पेक्षा यावर्षी अचलपूर तालुक्यात व परिसरात सर्वात कमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणे भरली नाहीत. विहिरीचा जलस्तर वाढले नाही. भर पावसाळ्यात विहिरीच्या खोदकामाला शेतकºयांनी सुरुवात केली आहे. त्यातच विजेचा लपंडाव सुरू असल्याने ते पीक वाचविण्याची कसरत करण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे पिकाला लागलेला खर्च निघणेही कठीण असल्याचे चित्र आहे. शासन व प्रशासनाने विजेचा लपंडावाचा प्रश्न सोडवावा, अशी शेतकºयांची मागणी आहे. शेतातील नांगरणी, वखरणी, डवरणी, उखरी आदी कामे बंद असल्यामुळे शेतकºयाला पिकांना पाणी देण्याचे एकच काम शिल्लक आहे. तेही विजेच्या लपंडावामुळे शक्य नसल्याने त्यांना शेतात दिवसभर विजेची प्रतीक्षा करून घरची वाट धरावी लागत आहे. त्यामुळे त्यांचा वेळही वाया जात आहे. वीजपुरवठा सुरळीत केल्यास मजूर वगार्लाही काम मिळेल, या बाबीकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.वीज वितरण कंपनीची कानउघाडणी कराशेतकºयांच्या पिकाला पाणी देण्याकरिता वीजपुरवठा सुरळीत ठेवावे, ही बाब शासनाने गंभीरतेने घेतली खरी, मात्र, वीज वितरण कंपनीची उदासिनता याला कारणीभूत ठरत आहे. वीज वितरण कंपनीची कानउघाडणी करण्याची नितांत गरज आहे, असे संतप्त शेतकरी नामदेव नारायण नागे यांनी प्रतिक्रिया दिली.शेतकरी हा देशाचा पोशिंदा असे म्हणून त्याची बोळवण केली जाते. मात्र, शेतकºयांची भिस्त पिकावर असताना वीज वितरण कंपनी या गळचेपी धोरणाकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.- सुधाकर हावरे,शेतकरी, पथ्रोट
विजेचा लपंडाव, शेती पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 1:40 AM
महिन्यापासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे व वाढत्या तापमानामुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत. तूर, कपाशी पिके पाण्याअभावी सुकत आहेत. केळी, संत्रा पिकांना भारनियमनाचा जबर फटका बसला असून, संत्रा पिकाला पुरेशी पाण्याची मात्रा मिळत नसल्याने ती गळून खाली पडत आहेत.
ठळक मुद्देआठ तासांचे भारनियमन : शेतकऱ्यांना चारच तास वीजपुरवठा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान