अचलपूर : लाखावर लोकसंख्या, हजारो ग्राहकांची सुविधा टाळून अचलपूर शहरातील महावितरणचे वीज बिल भरणा केंद्र व विजेसंबंधी तक्रार देण्याकरिता असलेले कार्यालय पाॅवर हाऊसमध्ये स्थानांतरित करण्यात आले. भाजप अचलपूर शहर मंडळकडून २९ जून रोजी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन ते परत सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
अचलपूर येथील देवळी भागातील महावितरणचे तक्रार केंद्र तथा वीज बिल भरणा केंद्र बंद करून तीन किलोमीटर दूर पाॅवर हाऊसमध्ये नेण्यात आले. ते पुन्हा शहरात सुरू करण्यात यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा भाजपने निवेदनातून दिला. याप्रसंगी अचलपूर मंडळ शहर अध्यक्ष अभय माथने, गजानन शर्मा, सुमीत चौधरी, शंकर बाछानी, राजेश चौधरी, महेश कडू, श्याम मांडेकर, आशिष मानमोडे, प्रफुल कुऱ्हेकर, रूपेश लहाने, विक्की बोरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
010721\img-20210630-wa0136.jpg
अचलपूर येथे विद्युत वीज भरणा केंद्र व तक्रार निवारण केंद्र उभारण्याची मागणी