शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

कोरडवाहू शेतकऱ्यांवर वीज कंपनीची वक्रदृष्टी

By admin | Published: June 09, 2016 12:24 AM

पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी झाल्याने तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरले आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे.

अचलपूर : वीजजोडणीसाठी झिजवावे लागतात उंबरठेअचलपूर : पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी झाल्याने तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरले आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे. अशाही परिस्थितीशी दोन हात करीत शेतकरी कृषीपंपाच्या जोडणीसाठी विद्युत कार्यालयात पायपीट करीत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील तीन-चार वर्षांपासून अचलपूर तालुक्यात नापिकीची स्थिती आहे. त्यामुळे अधिकाधीक जमीन सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न आहे. शासनाने यासाठी धडक सिंचन योजना सुरू केली. या योजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनाच वीजजोडणी तत्काळ स्वरुपाची केल्याने इतर शेतकरी मात्र सिंचन सुविधेपासून वंचित राहिले आहेत. तालुक्यात आतापर्यंत २ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज दाखल केले. त्यातील कित्येक शेतकऱ्यांचे अर्ज धूळखात पडले आहेत. विद्युत कंपनीचे कर्मचारी वीज जोडण्या देण्याचे काम कासवगतीने करीत आहेत. तालुक्याचे क्षेत्रफळ ६४,६३० हेक्टर आहे. त्यापैकी ५४,११६ हेक्टर जमीन लागवडीयोग्य आहे. यात ३३ टक्के जमीन मध्यम तर ३५ टक्के भारी स्वरुपाची आहे. यातील ३० ते ३५ टक्के शेती सद्यस्थितीत संरक्षित ओलीताखाली आल्याची माहिती आहे. संथगतीने होणारा शेतीप्रयोगाचा आलेख असाच राहिल्यास पुढे ५० वर्ष तालुक्यातील शेती ओलिताखाली येण्याची शक्यता नाही, असे मत जाणकार व अनुभवी शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. बागायती शेती करण्याची इच्छा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे असतांना अनावश्यक कागदपत्रे आणि मन:स्ताप शेतकऱ्यांच्या इच्छेला बाधक ठरत आहे.यामुळे मागेल त्याला शेततळे व वीजजोडणी तत्काळ देण्याची गरज असल्याचे मत बबल्या पोटे, गजानन मेहरे, सुभाष फुकटे, पांडुरंग काटोलकर (बोपापूर), मुरलीधर घुलक्षे, नरेंद्र राऊत, अतुल गणगणे, नीलेश मालगे, सुरेश मोहोड यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. (शहर प्रतिनिधी)