लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लाखो अमरावतीकरांची तहान भागविणाऱ्या अप्पर वर्धा धरणाचा सिंभोरास्थित पंप अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने बंद पडतो. इतक्या मोठया प्रमाणात पाणी पुरवठा करणारी यंत्रणा विज पुरवठ्याची ‘स्टँडबाय’ (पर्यायी) सुविधा का तयार करत नाही, असा प्रश्न अमरावतीकरांना पडला आहे. रविवारी सकाळी सिंभोरा येथील पंप वीजपुरवठ्याअभावी बंद पडल्याने अमरावतीकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अमरावती शहरात ९० हजारांवर ग्राहक असून त्या पाणीपुरवठ्यावर लाखो अमरावतीकरांची दिनचर्या अवलंबून आहे. पाण्याशिवाय सकाळची सुरुवात कशी करावी, असा प्रश्नच आहे. पाणीबचतीचा मुलमंत्र देणारी मजीप्रा आता एकदिवसाआड पाणी पुरवठा करीत आहे. ते अमरावतीकरांनी समजून घेतले. मजीप्राला सहकार्य केले. अधूनमधून पाईपलाईनच्या काही कामानिमीत्त पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याचेही अमरावतीकर मान्य केले. मात्र, आता पाणीबंदचे नवीन सकंटच पुढे आले आहे. महावितरणाचा विज पुरवठा बंद असला की पाणी पुरवठा बंद होऊ लागला आहे. सिंभोरा धरण परिसरातील विज खंडीत झाल्यावर मजीप्राचे पंपही बंद होतात. तासनतास वीज पुरवठा सुरळित केला जात नाही, ती प्रक्रिया संथ गतीने चालते. परिणामी अमरावतीकर नळात पाणी कधी येईल, या अपेक्षेने प्रतिक्षेतच असतात. मात्र, अमरावतीकरांच्या भावनेशी मजीप्रा व महावितरणला काही देणघेणे नाही. सिंभोरा पंपाला वीज पुरवठा करणाºया महावितरणाला मजीप्रा वर्षाकाठी १२ कोटीची रक्कम देते.
अंबानगरीसाठी शोकांतिकाचत्या मोबदल्यात महाराष्ट्र जीव प्राधिकरणला स्टँडबाय वीजपुरवठा सुविधा द्यावी. तसे केल्यास सिंभोरा धरणावरी पंप काही वेळात पूर्वरत होऊन पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकतो. मात्र, तशी सोयच गेल्या अनेक वर्षांपासून नाही. वीजपुरवठा खंडीत झाला की दुसºया लाईनवरून वीजपुरवठा सुरू करण्याची सोय मजीप्राने वीज वितरणाकडून घेतल्यास हे पाणी संकट दूर होऊ शकते.मात्र, याची दखलच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण किंवा महावितरण घेत नसल्याने अमरावतीकरांना, तिन्ही ऋतुमध्ये अशाच पाणी सकंटाला सामोरे जावे लागत आहे. ही अंबानगरीसाठी शोकांतिकाच आहे. गेल्या वर्षभरापासून पाणीपुरवठ्यात सातत्याने व्यत्यय येत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.महावितरणकडून विद्यूत पुरवठा बंद झाला की सिंभोराचे पंप बंद पडतात. परिणामी पाणी पुरवठा बंद होतो. मजीप्रा महावितरणाला दरवर्षाला १२ कोटींचे देयक भरते. त्यांनी स्टँडबाय सुविधा करून वीज पुरवठा सुरू ठेवण्याची सुविधा पुरवायला हवी. आम्हीही तसे प्रयत्न करीत आहोत.- किशोर रघुवंशी, उपविभागीय अभियंता. मजीप्रा.