लोकमत न्यूज नेटवर्कपुसला : येथील बचतगटाच्या महिलांनी एकत्र येऊन गावात दारूविरुद्ध एल्गार पुकारला आहे. आणखी संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचविण्यासाठी त्यांनी गावात दारूबंदी करण्यासाठी लढा देण्याचा निर्णय घेतला. रविवारी बचत गटाच्या बैठकीत त्यावर बहुमताने शिक्कामोर्तब झाले.पुसला गावात अलीकडच्या काळात दारूचा महापूर आल्याने महिला शक्ती एकवटली आहे. या गावाला धार्मिक व सांस्कृतिक वारसा लाभला आहे. अलीकडेच गावात मद्यपींची संख्या वाढीस लागली. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. गावात शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. गावात तंट्याचे प्रमाणसुद्धा वाढले. या प्रकाराला आळा बसावा, याकरिता गावातील महिला बचतगटांनी सभा घेऊन दारूबंदी अभियानाचा ठराव घेतला.सरपंच सारिका चिमोटे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय श्रीराव, पोलीस पाटील सारिका डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते इंद्र्रभूषण सोंडे, नवोदय पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित अळसपुरे, दक्षता कमिटी अध्यक्ष स्वप्निल मांडळे, स्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष राजू वरुडकर, सूरज धर्मे, एकता विकास मंचचे सिद्धार्थ डोंगरे, गुणवंत हेडावू, सुनील चिमोटे, त्रिशूल दिवाण, रमेश शिरभाते, संदीप बागडे, महिला बचत गट समन्वयक सुमन कोल्हे, ज्योती कुकडे, धनश्री अळसपुरे आदी उपास्थित होते.
पुसला येथील नारीशक्तीचा दारूविरुद्ध एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 10:27 PM
येथील बचतगटाच्या महिलांनी एकत्र येऊन गावात दारूविरुद्ध एल्गार पुकारला आहे. आणखी संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचविण्यासाठी त्यांनी गावात दारूबंदी करण्यासाठी लढा देण्याचा निर्णय घेतला. रविवारी बचत गटाच्या बैठकीत त्यावर बहुमताने शिक्कामोर्तब झाले.
ठळक मुद्देदारूबंदी : बचत गटाच्या बैठकीत बहुमताने निर्णय