लोकमत न्यूज नेटवर्कधारणी/चिखलदरा : जगप्रसिद्ध मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वैभव आणि विदर्भाची चेरापुंजी असे नामानिधान मिळालेल्या मेळघाटातील चिखलदरा या पर्यटनस्थळी दमदार पाऊस झाल्याने अख्खी वनसंपदा हिरवाईने नटली आहे. चिखलदरा आणि धारणी या दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या मेळघाटात आतापर्यंत ४१० मिमी पाऊस कोसळला.मेळघाटात १ जून ते ४ जुलै या कालावधीत एकूण ४८० मिमी पाऊस अपेक्षित असतो. प्रत्यक्षात बरसलेला पाऊस सरासरीपेक्षा कमी असला तरी या पावसाने मेळघाटातील नद्या पुन्हा एकदा प्रवाहित झाल्या आहेत. तापी, सिपना, गडगा, खंडू या नद्या तर दुथडी भरून वाहत आहेत. येथील पावसाळी वातावरण अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावले मेळघाटकडे वळू लागली आहेत.दमदार पावसाने एकीकडे खरिपाच्या पेरणीस प्रारंभ झाला असताना जंगलातील नैसर्गिक पाणवठे भरू लागले आहेत. वन्यप्राण्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.धारणी तालुक्यात तर पेरणीस मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. संपन्न वनसंपदा व जैवविविविधतेसाठी मेळघाट ओळखला जातो. ती ओळख अधिक व्यापक करणारा पाऊस दमदारपणे कोसळल्याने येथील यंदाची पाणीटंचाई गुडुप होण्याच्या मार्गावर आहे. एकंदरीत दोन्ही तालुक्यांत चांगला पाऊस झाल्याने सर्व घटक आनंदी झाले आहेत.धारणीत अधिक पाऊस१ जून ते ४ जुलै या कालावधीत धारणी तालुक्यात २०९.३ मिमी पाऊस अपेक्षित असतो. प्रत्यक्षात सरासरीजवळ जाणाऱ्या २०६.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. चिखलदरा तालुक्यात अपेक्षित २७०.९ मिमीच्या तुलनेत २०४.१ मिमी पाऊस पडला. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत हे प्रमाण ३१ टक्के आहे.
मेळघाटात जोरदार सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 11:09 PM
जगप्रसिद्ध मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वैभव आणि विदर्भाची चेरापुंजी असे नामानिधान मिळालेल्या मेळघाटातील चिखलदरा या पर्यटनस्थळी दमदार पाऊस झाल्याने अख्खी वनसंपदा हिरवाईने नटली आहे. चिखलदरा आणि धारणी या दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या मेळघाटात आतापर्यंत ४१० मिमी पाऊस कोसळला.
ठळक मुद्देसिपना, तापी, खंडूला खळखळाट : व्याघ्र प्रकल्पास दिलासा, ४१० मिमी पाऊस