शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमधील वाद मिटला, कोल्हेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली; फेसबुकवर केली भावनिक पोस्ट
2
जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला
3
राज ठाकरेंच्या उमेदवारांना भाजप पाठिंबा देणार? बाळा नांदगावकरांचे महत्वाचे वक्तव्य
4
माहिमच्या हायप्रोफाइल लढतीत उद्धव ठाकरेंनी उतरवला शिवसैनिक, कोण आहेत महेश सावंत?
5
Mahayuti Seat Sharing: 106 जागांचा गुंता, कोणत्या विभागातील किती जागांची घोषणा बाकी?
6
मंत्रि‍पदासाठी फोन आला, १०० रुपये उसने घेऊन कपडे घेतले अन् शपथविधीला गेले; श्रीगोंद्यातील नेत्याचा किस्सा! 
7
अरे देवा! ७ मुलांची आई बॉयफ्रेंडसह पळून गेली, ढसाढसा रडत मुलांनी गाठलं पोलीस ठाणं, म्हणाले...
8
“१०५चा आकडा फेक, मविआत ४-५ जागांवर अजून मतभेद”: नाना पटोले; काँग्रेसची यादी कधी येणार?
9
उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंना सदा सरवणकरांनी डिवचलं; म्हणाले, "एक दिवस..."
10
प्रभासने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिले सरप्राइज, 'राजा साब'चा दमदार पोस्टर रिलीज
11
Jio Financial ची आणखी एक खेळी; 'या' कंपनीसोबत विकणार इन्शूरन्स पॉलिसी, चर्चा कुठवर?
12
बेंजामिन नेतन्याहू यांच्या बेडरूमपर्यंत पोहोचलं हिजबुल्लाहचं ड्रोन, पण...! इस्रायलचं टेन्शन वाढलं
13
दिवाळीत Cash मध्ये केवळ 'इतकं'च खरेदी करू शकता Gold; जास्त घेतल्यास द्यावी लागेल 'ही' माहिती
14
चोरी करण्यासाठी विमानाने जायचे; हायटेक गँगचा पोलिसांनी केला पर्दाफाश, ५ जणांना अटक
15
माहिममध्ये रंगणार तिरंगी लढत, ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर
16
प्रियंका गांधी यांनी वायनाड येथून भरला उमेदवारी अर्ज, काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन
17
एकाच घरात आमदार, खासदार पदे; राज्याच्या राजकारणात फक्त 'या' घराण्यांचं वर्चस्व?
18
जाहीर सभेत प्रवीण माने हुंदके देऊन ढसाढसा रडले, वडिलांच्याही डोळ्यांत पाणी; नेमकं काय घडलं?
19
'अचानक सर्वकाही ठीक होईल, या भ्रमात राहू नका', भारत-चीन करारावर व्हीके सिंह स्पष्ट बोलले
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राधानगरीच्या के.पी. पाटलांनी ठाकरे गटात केला प्रवेश; शिंदे गटाच्या आबिटकरांविरोधात रिंगणात उतरणार

स्वाईन फ्लूूच्या संशयीत रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष

By admin | Published: September 10, 2015 12:13 AM

तालुक्यात स्वाईन फ्लूने एका इसमाचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वरूडमध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणवरुड : तालुक्यात स्वाईन फ्लूने एका इसमाचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी तालुका आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. ग्रामीण रुग्णालयात स्वाईन फ्ल्यूच्या संशयीत रुग्णांसाठी विशेष विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. साथीच्या आजारावरील उपचारासाठी सुध्दा तालुक्यात आरोग्य पथक सज्ज आहे. २४ तास उपचार सेवा सुरु करण्यात आल्याने कोणत्याही प्रकारचा ताप आल्यास रुग्णालयात संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार यांनी केले आहे. तालुक्यात तापाच्या साथीने डोके वर काढले आहे. तीन वर्षांपूर्वी तालुक्यात स्वाईन फ्लूची साथ आली होती. त्याची पुनरावृत्ती तर होणार नाही ना? अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. सद्यस्थितीत शेकडो रुग्ण तापाने फणफणत आहेत.सुश्रुषा, देखरेखीसाठी कर्मचारी सज्ज स्वाईन फ्लूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु त्यांनी कोणत्याही तापाला घाबरुन जाऊ नये. ताप आल्यास तातडीने ग्रामीण रुग्णालयात संपर्कसाधून तपासणी करावी. स्वाईन फ्लूचा संशयीत आढळल्यास त्याच्या उपचारासाठी विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. ‘ब’ वर्गात असलेल्या रुग्णांना टॅमी फ्लू गोळयांची मात्रा देऊन ४८ तास या वार्डात देखरेखीत ठेवण्यात येते. ४८ तासानंतर स्वाईन फ्लू जंतुंचे निर्जंतुकीकरण करुन आंतररुग्ण विभागात हलविण्यात येते. यामुळे इतरांना या आजाराची लागण होत नाही, असेही वैद्यकीय अधीक्षक पोतदार यांनी सांगितले.