शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

आपत्कालीन सेवा बनली किरकोळ जखमींना वरदान

By admin | Published: August 31, 2015 12:09 AM

गोरगरीब जनतेला आपत्कालीन स्थितीत आरोग्यसेवा देणारी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका किरकोळ जखमी व सर्वसाधारण आजारी रुग्णांसाठी वरदान ठरली आहे.

शासकीय निधीचा दुरुपयोग : इर्विनमधील रुग्णांच्या संख्येत वाढअमरावती : गोरगरीब जनतेला आपत्कालीन स्थितीत आरोग्यसेवा देणारी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका किरकोळ जखमी व सर्वसाधारण आजारी रुग्णांसाठी वरदान ठरली आहे. त्यामुळे शासकीय निधीचा दुरुपयोग केला जात असल्याचे चित्र दिसू लागले आहे. दररोज सर्वसाधारण रुग्णांना इर्विनमध्ये दाखल केले जात असल्यामुळे दिवसेंदिवस इर्विनमध्येही रुग्णांची संख्या वाढतच आहे. मात्र, याकडे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट होत आहे. जनतेला तत्काळ आरोग्यसेवा देण्यासाठी शासनाने १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सर्व शासकीय रुग्णालयांना उपलब्ध करून दिल्या आहेत. सुरुवातीला केवळ आपत्कालीन स्थितीतील रुग्णांसाठी रुग्णवाहिकेचा उपयोग केला जात होता. मात्र, आता सर्रारपणे किरकोळ जखमी अथवा सर्वसामान्य आजार असणाऱ्या रुग्णांनाही रुग्णवाहिका ने-आण करीत असल्याचे आढळून येत आहे. जिल्ह्यात कुठेही अपघात झाल्यास बहुतांश नागरिक १०८ क्रमांकावर कॉल करून रुग्णवाहिका बोलावितात, तो रुग्ण किरकोळ जखमी असल्यास त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रावर न नेता थेट इर्विन रुग्णालयात आणले जात आहे. किरकोळ जखमी व अथवा आजारी रुग्णांचा प्राथमिक उपचार या केंद्रावर केला जावू शकतो. मात्र, तसे न होता थेट रुग्णांना इर्विनमध्ये दाखल केले जात आहे. त्यातच मद्यपी यथेच्च दारू ढोसून मार्गालगत किरकोळ जखमी अवस्थेत पडले असल्यास त्यांनीही रुग्णवाहिका आरोग्यसेवा देत असल्याचे अनेक प्रकार उघड झाले आहे. दररोज जिल्ह्यात १० ते १५ रुग्ण १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने इर्विन रुग्णालयात आणले जात आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ५ ते ६ रुग्णच आपत्कालीन स्थितीतून आणले जात असून अन्य रुग्ण किरकोळ स्थितीत असतानाही त्यांना रुग्णवाहिकेची सेवा देण्यात येत आहे. त्यामुळे सद्यस्थिथीत बहुतांश नागरिक साधारण रुग्णांसाठीही १०८ क्रमांकावर कॉल करून रुग्णवाहिका बोलावून घेत आहेत. इर्विनमधील रुग्णवाढीला १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका कारणीभूत ठरत असल्याची ओरड वैद्यकीय अधिकारी करीत असून वाढत्या रुग्णसंख्येमुळे डॉक्टरांवर कामाचा ताण वाढला आहे. याकडे इर्विन प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे आहे. शासकीय रुग्णवाहिका दलालांच्या कचाट्यातगरजंूना तत्काळ आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने के्रंद शासनाने महाराष्ट्रातील काही शहरांत १०८ क्रमांकाची सुविधा दिली. नि:शुल्क सेवा देणारी ही रुग्णवाहिका सद्यस्थितीत दलालाच्या कचाट्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. इर्विनमधून गंभीर रुग्णांना जिल्हाबाहेरील रुग्णालयात पाठविण्याचे सांगण्यात येते. अशावेळी रुग्णांचे नातेवाईक खासगी रुग्णवाहिकेची मदत घेण्यासाठी जातात. मात्र, खासगी रुग्णवाहिकेचे भाडे परवडणारे नसते. अशावेळी दलाल रुग्णांच्या नातेवाईकांना गाठून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे सांगतात.