शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
2
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
4
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
5
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
6
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
7
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
8
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
9
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
10
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
11
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
12
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
13
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
14
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
15
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
16
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
17
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
18
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
19
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
20
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात

‘लम्पी’च्या उपचाराऐवजी मेळघाटात अंधश्रद्धेचा बाजार; गावदेवाजवळ नारळ, लिंबू आणि नवस कबूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2022 2:49 PM

लसीचा तुटवडा पाहता, पाहिजे त्या प्रमाणात अजूनही लसीकरण सुरू झाले नाही.

नरेंद्र जावरे

चिखलदरा (अमरावती) : गुरांवर आलेल्या ‘लम्पी’ या आजारासाठी मेळघाटातील आदिवासी बांधव थेट गावदेव असलेल्या मुठादेवाला साकडे घालत आहे. काहींनी नवस कबूल केल्याचे चित्र गुरुवारी तालुक्यातील चिखली या गावात पाहायला मिळाले. त्यामुळे आदिवासींची प्रत्येक सुखदुःखात असलेली अंधश्रद्धा पुन्हा एकदा पुढे आली आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातील आदिवासी पाड्यांमध्ये गुरांवर मोठ्या प्रमाणात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पशुपालक असलेले गोरगरीब आदिवासी शेतकरी हवालदिल झाले आहेत, तर दुसरीकडे हा आजार रानगवा या गायवर्गीय प्राण्यांसह इतरही प्राण्यांवर पसरू नये, यासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रातील गावांमध्ये जनजागृती व लसीकरणाची माहिती दिली जात आहे. तथापि, पशुवैद्यकीय विभाग पाहिजे त्या प्रमाणात लस उपलब्ध नसल्यामुळे थिटा पडला आहे.

पाच किलोमीटरची सीमा सील

‘लम्पी’ आजाराची लागण झालेल्या आदिवासी पाड्यातील पाच किमी अंतरावरच असलेल्या गावात उपाययोजना व तातडीने लसीकरण करण्याची गरज आहे. परंतु, मेळघाटातील आदिवासी पाडे जंगल सीमारेषेवर असल्याने पशू विभाग व व्याघ्र प्रकल्पाला तारेवरची कसरत करून वन्यजिवांना वाचवण्याची गरज आहे. लसीचा तुटवडा पाहता, पाहिजे त्या प्रमाणात अजूनही लसीकरण सुरू झाले नाही.

‘भगवान भरोसे हमारे जानवर’

मेळघाटातील आदिवासींमध्ये सुखात आणि दुःखात पारंपरिक पूजा असली तरी ती अंधश्रद्धा असल्याने आजारांवरही गावदेवाची पूजा सुरू झाली आहे. चिखली गावातसुद्धा गुरुवारी सकाळी पूजापाठ करण्यात आल्याची माहिती गावकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्याच वेळी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी लसीकरणासाठी पोहोचले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद वानखडे यांनी सांगितले.

गुरे पाणी पीत नाहीत, चारा खात नाहीत. हा रोग बरा व्हावा, यासाठी गावदेव असलेल्या मुठादेवाजवळ आम्ही आदिवासींनी पूजाअर्चा केली. नवस कबूल केला व प्रार्थना केली.

- अभिराम भारवे, शेतकरी, चिखली.

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोगMelghatमेळघाट