लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रादेशिक वनविभाग पूर्व मेळघाटच्या चिचोणा बीटमध्ये राखीव वनक्षेत्रात अतिक्रमण होत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. मात्र, या गंभीर प्रकरणी उपवनसंरक्षक, वनक्षेत्राधिकारी, वनपाल आदींनी दुर्लक्ष चालविल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत २३ जणांनी राखीव वनक्षेत्रात अतिक्रमण केल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.अंजनगाव वनपरिक्षेत्र खिरकुंड वर्तुळातंर्गत चिचोणा बीटमध्ये ८१, ८२, ५ व ६ वनविभागात अतिक्रमण झाले आहे. सुमारे २० हेक्टर परिसरात ग्रामस्थांनी अतिक्रमण केल्याची माहिती आहे. तर काही राखीव वनक्षेत्र अक्षरश: शेतीसाठी घेरण्यात आले आहे. राखीव वनक्षेत्रात अतिक्रमण होत असताना वनक्षेत्राधिकारी, वनपालांना ही बाब दिसू नये, हे आश्चर्यकारक मानले जात आहे.काही महिन्यांपूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसितांनी त्याच गावात ठिय्या मांडून जंगल न सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु याप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडवावा लागला, हे विशेष.अंजनगाव वनपरिक्षेत्रातील चिचोणा बीटमध्ये अतिक्रमण झाले असेल तर ही बाब गंभीर आहे. याबाबत संबंधितांना जाब विचारला जाईल. राखीव वनक्षेत्रातील अतिक्रमण हटविले जाईल. दोषी वनकर्मचाºयांवर प्रशासकीय कारवाई करू.- पियूषा जगतापउपवनसंरक्षक, पूर्व मेळघाट
पूर्व मेळघाट वनक्षेत्रात अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 1:17 AM
प्रादेशिक वनविभाग पूर्व मेळघाटच्या चिचोणा बीटमध्ये राखीव वनक्षेत्रात अतिक्रमण होत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. मात्र, या गंभीर प्रकरणी उपवनसंरक्षक, वनक्षेत्राधिकारी, वनपाल आदींनी दुर्लक्ष चालविल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्देवनाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : २३ व्यक्तींनी अतिक्रमण केल्याची माहिती